POK : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये हिंसा

आंदोलक-सुरक्षा दल संघर्षात ३० ठार, २०० हून अधिक जखमी


रावलकोट : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आंदोलनकर्ते आणि पाकिस्तानी सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात ३० जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. महागाई, वाढती बेरोजगारी, वीजदरवाढ आणि राजकीय हक्कांच्या प्रश्नांवरून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. स्थानिक प्रशासनाने जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत बेकायदेशीर घोषित केला आणि त्यावर बंदी घातली. यानंतर आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष उफाळून आला.



गेल्या आठवड्यात रावळकोट येथे एका व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे प्रशासनाचा हात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. रविवारी रात्री आंदोलकांनी रुग्णालय आणि शवगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच चिघळली. पूँछ विभागाचे पोलिस अधीक्षक सरदार वाहिद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गोळीबारात किमान सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आणि विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या.



नागरिकांमध्ये मोठा असंतोष


सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी रायफल, पेट्रोल बॉम्ब आणि इतर शस्त्रांचा वापर करून प्रतिकार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मंगळवारी आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात पसरल्यानंतर पोलिस, सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढती महागाई, वीज बिलांचा बोजा, बेरोजगारी आणि राजकीय अधिकारांबाबतची नाराजी यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.



अनेक शहरांतील बाजारपेठा बंद


संघर्षानंतरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये बरनाला, भिमबर आणि मीरपूर येथे मोठ्या प्रमाणात जमलेले आंदोलक दिसत आहेत. तसेच मुझफ्फराबाद येथे सुरक्षा दलांनी आंदोलकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फेकल्याचे दृश्यही समोर आले आहे. संघर्षानंतर वाढलेल्या तणावामुळे अनेक शहरांतील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून, काही भागांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.



मृतांचा आकडा वाढण्याची भीती


या हिंसक संघर्षात जवळपास ३० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलातील जवानांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जखमींची संख्या २०० च्या पुढे गेली असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तान प्रशासनाने संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री