Virar News : मोबाईल कॅमेऱ्याच्या झूममुळे उलगडलं रहस्य; विरारच्या डोंगरात झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह आढळला

विरार : विरार (Virar) तालुक्यातील मांडवी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीद कोपर येथील कुलस्वाई माता मंदिराजवळील डोंगराळ भागात एका ३४ वर्षीय तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात फोटोशूट करत असलेल्या एका तरुणाने फोटोला झूम केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला. (Virar News)



मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्ष पाटील हा तरुण कुलस्वाई माता मंदिर परिसरात छायाचित्रण करत होता. यावेळी त्याने डोंगराळ भागाकडे मोबाईलचा कॅमेरा झूम करून पाहिले असता एका झाडाला व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार लक्षात येताच त्याने तात्काळ मांडवी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास करण्यात आला असता त्याच्याकडील आधार कार्डावरून त्याचे नाव लालमोहन पारस चौहान (वय 34) असे असल्याचे समोर आले. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मांडवी पोलीस अधिक तपास करत आहेत.



दरम्यान, दुर्गम डोंगराळ भागात हा मृतदेह होता. त्यामुळे मोबाईल कॅमेऱ्याचा झूम वापरून हा प्रकार निदर्शनास आला नसता, तर मृतदेह अनेक दिवस तिथेच राहिला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे

Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय सुरक्षा

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; दान केलेले सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत का ?

 Shirdi :  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

POP Ganesh Idol Ban Decision 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळण्याची शक्यता

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; सुवर्णदानाचा मोठा वर्षाव ; तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

Pradhan Mantri pik vima yojana : एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढली

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri pik vima yojana) सहभागी