Chief Minister Devendra Fadnavis : डहाणू 'लव्ह जिहाद'प्रकरणी एसआयटी स्थापन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस महासंचालकांना आदेश


मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींसोबत घडलेल्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि संशयास्पद फंडिंगशी जोडलेले असल्याचा दाट संशय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ 'विशेष तपास पथक' (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका पोलीस अधीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही 'एसआयटी' काम करणार आहे.



भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. डहाणूतील या पीडित मुलींना 'स्टुडंट व्हिसा'च्या नावाखाली लंडनला नेण्याचे मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले गेल्याचा संशय आमदार वाघ यांनी व्यक्त केला होता. "महाराष्ट्राच्या लेकींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि नराधमांसह त्यांच्या आंतरराष्ट्रीय 'मास्टरमाइंड'ला ठेचण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली.डहाणू पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, एका विशिष्ट समुदायाच्या तरुणाने एका तरुणीला जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले होते. या व्हिडिओंच्या आधारे संबंधित तरुणीला आणि तिच्या बहिणीला ब्लॅकमेल करून अत्याचार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप आहे. हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्यावर नियोजनबद्ध पद्धतीने अत्याचार करण्याचे हे सत्र सुरू असल्याचे समोर आल्यानंतर डहाणूमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.



आंतरराष्ट्रीय कट?


या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार चित्रा वाघ यांनी डहाणू पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला होता. "अशाप्रकारे फूस लावून केवळ डहाणूच नव्हे, तर पालघर जिल्ह्यातील अनेक मुलींना थेट लंडनला नेण्यात आले आहे," असा खळबळजनक दावा वाघ यांनी केला होता. हा सर्व प्रकार आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा भाग असल्याचा संशय आल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि त्याचे साथीदार सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांची दोन पथके परराज्यात रवाना करण्यात आली आहेत. आता 'एसआयटी'ची स्थापना झाल्यामुळे या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय नेटवर्क, संशयास्पद आर्थिक व्यवहार (फंडिंग) आणि धर्मांतराचा अँगल या सर्व बाजूंचा कसून तपास केला जाणार आहे.




Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ