नवी दिल्ली : पश्चिम आशिया आणि खाडी प्रदेशातील तणाव वाढल्यानंतर भारताने सोमवारी पुन्हा एकदा संघर्ष तातडीने कमी करण्याचे तसेच संवादाच्या माध्यमातून तोडगा काढून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, १०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी हालअपेष्टा निर्माण झाल्या असून जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. (Israel-Iran Conflict)
रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली-हर्णे बायपास परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजूर ...
निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सर्व संबंधित पक्षांना तात्काळ तणाव कमी करण्याचे, सामान्य नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्याचे आवाहन करतो, जेणेकरून या प्रदेशात पुन्हा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकेल. (Israel-Iran Conflict)
शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी नवी दिल्लीकडून करण्यात आलेले हे आवाहन गेल्या २४ तासांत वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. या काळात अनेक शहरांमध्ये लष्करी चकमकी, धोरणात्मक ठिकाणांवरील हवाई हल्ले आणि संपूर्ण प्रदेशात तीव्र गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. (Israel-Iran Conflict)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या (BMC) सचिव विभागात मागील काही वर्षांपासून शिपाई पदाच्या अनेक जागा रिक्त असून आता या पदाच्या रिक्त जागा ...






