जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे (Amalner- Dhule) महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण तिहेरी अपघात (Accident) झाला. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon Accident)
हा अपघात सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरकडून धुळ्याकडे जाणारी एसटी बस, एक कार आणि दुचाकी मार्गावर असताना समोरून येणाऱ्या गुजरात पासिंग कारने नियंत्रण गमावून जोरदार धडक दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली-हर्णे बायपास परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजूर ...
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील महिला आणि पुरुषांसह एकूण ६ जणांनी घटनास्थळीच प्राण गमावले. अपघातानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.
अपघातात एक लहान मुलगा कारमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिक, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून मुलासह इतर जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना पुढील उपचारासाठी गुजरातमधील व्यारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.





