मुंबई : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० मुंबई लीग २०२६ मधील सामन्यात अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने अष्टपैलू खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोलंदाजीत प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडल्यावर फलंदाजीतही वादळी अर्धशतक झळकावत अर्जुनने ‘आर्क्स अंधेरी’ संघाला ‘वांद्रे ब्लास्टर्स’वर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्यात अर्जुनचा अक्षरशः ‘वन मॅन शो’ पाहायला मिळाला. (Arjun Tendulkar T20 Mumbai League)
गोलंदाजीत अर्जुनचा कहर :
आयपीएल 2026 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघरचनेत महत्त्वाचे बदल करत भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहलीच्या ...
मुशीरसोबत ११६ धावांची विजयी भागीदारी :
१४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीला सुरुवातीला धक्का बसला. सलामीवीर दिव्यांश सक्सेना २६ धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या मुशीर खान (Mushir Khan) आणि अर्जुन तेंडुलकर यांनी सामन्याचा रंगच बदलून टाकला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ११६ धावांची भागीदारी रचत वांद्रेच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत त्यांनी सामना एकतर्फी केला. (Arjun Tendulkar T20 Mumbai League)
View this post on Instagram
३४ चेंडूत ६६ धावांची तुफानी खेळी :
फलंदाजीत अर्जुनने आक्रमक अवतार धारण केला. त्याने केवळ ३४ चेंडूंमध्ये ६६ धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला मुशीर खानने ३८ चेंडूंमध्ये ५४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर आर्क्स अंधेरीने अवघ्या १३.५ षटकांत १४५ धावांचे लक्ष्य पार केले. विशेष म्हणजे संघाने तब्बल ३७ चेंडू राखून विजय मिळवला. (Arjun Tendulkar T20 Mumbai League)
Bangkok Thailand : स्वप्ने पाहण्यासाठी मोठी शहरे किंवा आलिशान सुविधांची गरज नसते, तर ती पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द. मिझोरामच्या एका छोट्याशा गावातून ...
सामन्याचा खरा हिरो अर्जुन :
View this post on Instagram





