Fuel Price Hike : महागाईचा तिहेरी स्फोट! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ सुरू असून त्याचे परिणाम आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये झालेल्या सलग वाढीमुळे महागाईचा तिहेरी फटका बसला आहे. वाहनचालकांपासून गृहिणींपर्यंत प्रत्येकाच्या खिशावर याचा परिणाम होत आहे. (Fuel Price Hike)


गेल्या चार वर्षांपासून तुलनेने स्थिर असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर मे २०२६ पासून वाढू लागले. चार टप्प्यांत झालेल्या दरवाढीनंतर इंधनाचे दर सुमारे ७.५० रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा दबाव आणखी तीव्र झाला आहे. (Fuel Price Hike)



घरगुती गॅस सिलेंडर ९४२ रुपयांवर :


फेब्रुवारीअखेरपर्यंत दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर ८५३ रुपयांना मिळत होता. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर परिणाम झाला आणि ७ मार्च रोजी तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली. त्यानंतर जूनमध्ये आणखी २९ रुपयांची वाढ झाल्याने आता दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या काही महिन्यांत घरगुती सिलेंडर ८९ रुपयांनी महागला आहे. (Fuel Price Hike)



व्यावसायिक सिलेंडरने गाठला ३ हजारांचा टप्पा :


हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांना वापरावा लागणारा १९ किलोचा एलपीजी सिलेंडर सर्वाधिक महागला आहे. फेब्रुवारीमध्ये १,७४०.५० रुपये असलेला हा सिलेंडर आता तब्बल ३,११३.५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच केवळ तीन महिन्यांत १,३७३ रुपयांची वाढ झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सलग झालेल्या दरवाढींमुळे व्यावसायिक गॅस वापरणाऱ्या उद्योगांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किंमतींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Fuel Price Hike)



CNG देखील महाग :


पेट्रोल आणि एलपीजीनंतर सीएनजी वापरणाऱ्या वाहनधारकांनाही दिलासा मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचा दर ८१.०९ रुपये प्रति किलो झाला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी ८९.७० रुपये प्रति किलो दराने मिळत असून गुरुग्राममध्ये हा दर ८६.१२ रुपये प्रति किलो झाला आहे. १५ मे आणि १७ मे रोजी झालेल्या वाढीनंतर ही आणखी एक दरवाढ असल्याने वाहनधारकांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. (Fuel Price Hike)



सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले :


इंधन, गॅस आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती खर्च, प्रवास खर्च आणि व्यवसायिक खर्च तिन्ही पातळ्यांवर परिणाम होत आहे. महागाई आधीच उच्चांकावर असताना झालेल्या या तिहेरी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट विस्कळीत झाले असून पुढील काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Fuel Price Hike)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे