Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल


पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या आधुनिकीकरणानंतर नव्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २५ जूनपर्यंत तब्बल २१ दिवसांचा ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत अनेक एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले असून काही गाड्या रद्द, अंशतः रद्द किंवा पर्यायी मार्गाने चालवण्यात येणार आहेत. (Pune-Miraj Railway 21 Days Block)


रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सिग्नल यंत्रणा, ट्रॅक जोडणी आणि सुरक्षा प्रणाली अधिक आधुनिक करण्यासाठी ही महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, याचा फटका पुणे-मिरज मार्गावरील हजारो प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. (Pune-Miraj Railway 21 Days Block)



अनेक गाड्या उशिराने धावणार :


मेगा ब्लॉकच्या काळात कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस, कोल्हापूर-पुणे डेमू, बेंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस, बेंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस आणि मैसूर-अजमेर एक्स्प्रेस या गाड्यांना विविध स्थानकांवर १५ मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune-Miraj Railway 21 Days Block)



जाणून घ्या हे महत्वाचे बदल :


२४ जून रोजी निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस मनमाड-दौंड-कुडुवाडी-मिरज या पर्यायी मार्गाने धावणार.
२० जून रोजी कोल्हापूर-पुणे डेमू सुमारे दोन तास उशिराने, दुपारी १२.५० वाजता कोल्हापूरहून सुटणार.
२१ जून रोजी मिरज-निजामुद्दीन एक्स्प्रेस सुमारे १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार.
२५ जून रोजी कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने, दुपारी ४.५० वाजता सुटणार. (Pune-Miraj Railway 21 Days Block)



या गाड्या पूर्णपणे रद्द :


मेगा ब्लॉकमुळे काही स्थानिक सेवांवरही परिणाम होणार आहे.


पुणे-फलटण-पुणे डेमू – १७ आणि २५ जून
लोणंद-फलटण-लोणंद डेमू – १७, १९ आणि २५ जून
पुणे-सातारा डेमू – १९ आणि २५ जून
सातारा-पुणे डेमू – १७ ते २१ जून तसेच २४ आणि २५ जून (Pune-Miraj Railway 21 Days Block)



'वंदे भारत'ची धाव साताऱ्यापर्यंतच :


१९ जून रोजी हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस केवळ साताऱ्यापर्यंतच धावणार असून सातारा ते पुणे हा प्रवास रद्द राहणार आहे. तसेच कोल्हापूर-पुणे डेमू ९, १६, २२ आणि २३ जून रोजी साताऱ्यापर्यंतच धावेल. १९ आणि २५ जून रोजी ही सेवा लोणंदपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. याशिवाय, १५ जून रोजी बिकानेर-मिरज एक्स्प्रेस खडकीपर्यंतच धावणार असून परतीच्या प्रवासात १६ जून रोजी मिरज-बिकानेर एक्स्प्रेस खडकीहून सुटणार आहे. (Pune-Miraj Railway 21 Days Block)


दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाइनवर गाड्यांच्या अद्ययावत वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. (Pune-Miraj Railway 21 Days Block)

Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी