Bhayander Illegal Mosque Demolished : मीरा-भाईंदरमध्ये मोठी कारवाई; अनधिकृत मशीद पाडली, परिसरात तणावपूर्ण शांतता

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील भाईंदर पूर्व येथील आझादनगर परिसरात आज सकाळी मोठी कारवाई करण्यात आली. सरकारी जमिनीवर गेल्या २० वर्षांहून अधिक काळ अतिक्रमण करून उभारलेली अनधिकृत मशीद कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. (Bhayander Illegal Mosque Demolished)


मिळालेल्या माहितीनुसार, ही जमीन महापालिकेसाठी आरक्षित असून येथे विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. मात्र, या भूखंडावर दीर्घकाळापासून अतिक्रमण असल्याचे समोर आले होते. याआधी परिसरातील इतर अतिक्रमणे हटवण्यात आली होती, मात्र मशिदीचा मुद्दा अनेक वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी होता. (Bhayander Illegal Mosque Demolished)



अखेर आज सकाळी महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत ही अनधिकृत रचना हटवली. कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. (Bhayander Illegal Mosque Demolished)


दरम्यान, स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, ही जमीन भविष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कलादालन (आर्ट हॉल) उभारण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर विकासकामांसाठी मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. (Bhayander Illegal Mosque Demolished)



घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (Bhayander Illegal Mosque Demolished)




Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.