Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय

मुंबई : आरे दुग्ध वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी २० वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला दिलेली ३३.६ एकर मोक्याची जमीन अखेर राज्य शासनाने पुन्हा ताब्यात घेतली आहे. तत्कालीन सरकारने २८ जून २००६ रोजी मे. बामकोटेक प्रा. लि. कंपनीच्या बाजूने जारी केलेला वादग्रस्त शासन निर्णय रद्द करण्यात आला असून, यासंबंधीचा नवा 'जीआर' सोमवारी जारी करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली.



२००६ मध्ये जारी करण्यात आलेल्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच कायदेशीर वादाचा सामना करावा लागला होता. संबंधित जमीन ही 'ना-विकास क्षेत्रा'त येत असल्याने तिथे कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वसन किंवा बांधकाम करता येणार नाही, या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने ५ डिसेंबर २०१६ रोजी विशेष अधिसूचना काढून आरे दुग्ध वसाहत परिसर हा 'पर्यावरण संवेदनशील क्षेत्र' (इको-सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित केला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या २०१४-२०३४ च्या विकास आराखड्यानुसार हे क्षेत्र 'हरित पट्टा' म्हणून अधिसूचित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची बांधकामे अथवा पुनर्वसनाची कामे करणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य बनले होते.



नेमके काय झाले?

दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रात आणि मुंबई उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या रिट व जनहित याचिकांवर दिलेल्या निकालांचा आधार घेऊन अखेर हा निर्णय रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हरित पट्ट्याचे संरक्षण करणे आणि पर्यावरण नियमांचे उल्लंघन टाळणे ही शासनाची जबाबदारी असल्याने, ही ३३.६ एकर जमीन (सिटीएस क्र. ५८९-अ) मे. बामकोटेक प्रा. लि. यांच्याकडून परत घेऊन तात्काळ शासनाच्या ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Comments
Add Comment

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात