Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा परिसरात ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महावितरणच्यावतीने लवकरात लवकर शिबिराचे आयोजन करून ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे. तसेच या परिसराच्या वाढत्या वीजची मागणी लक्षात घेता १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्यात यावेत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी दिले.



एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या कार्यालयात आवास ते रेवदंडा किनारपट्टी परिसरातील वाढत्या वीज मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, अलिबाग मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेश भगत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकाश तायडे, कार्यकारी अभियंता अविनाश पगारे, ज्येष्ठ भाजप नेते सतीशजी धारप, वैकुंठ पाटील (रायगड जिल्हा परिषद सदस्य), व संकेत जोशी, उदय काठे भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थआदी मान्यवर उपस्थित होते.



ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर म्हणाल्या, अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा या किनारपट्टीच्या गावामध्ये सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांनी घराघरात छोटे-छोटे कॉटेज, होमस्टे व इतर पर्यटन पूरक सुविधा निर्माण केल्या आहेत. या परिसरात वाढलेल्या पर्यटन व्यवसायामुळे विजेची मागणी लक्षात घेता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने येथील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. याचबरोबर या परिसरात शिबिराचे आयोजन करून ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करावे तसेच या शिबिरात पीएम सूर्य घर योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचावावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार

Ritu Tawde : महापौरांच्या गाडीतून त्या नवजात बाळाचा झाला गृहप्रवेश

बाळंतिणीच्या मदतीला धावून गेल्या महापौर मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रसारमाध्यमातून विविध

Crime News : मुंबईत तरुणाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडले; आरोपीला अटक

मुंबई : मुंबईतील धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या

Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी ३० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार, ट्रान्स-हार्बर सेवाही बंद

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३०

Orry broke his silence on dispute : "माझ्यासाठी तो काळ नरकासारखा होता"; ओरीच साराच्या आईसोबत काय वाकड ? सारा सोबतची मैत्रीही तुटली, धक्कादायक खुलासे

मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित