MARINA PROJECT : मच्छीमारांना विश्वासात घेऊनच 'मरीना' प्रकल्प पूर्ण करणार- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

MUMBAI : "मुंबईतील कफ परेड येथे साकारण्यात येणारा प्रस्तावित 'मरीना' प्रकल्प हा मुंबईच्या सागरी पर्यटन, जलवाहतूक आणि किनारी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वैभवात भर पडणार असली, तरी स्थानिक पारंपरिक कोळी बांधवांच्या उपजीविकेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची सर्वस्वी काळजी घेतली जाईल. मच्छीमारांना पूर्ण विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सर्व शंका-आक्षेपांचे निरसन करूनच हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल," अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथे दिली. मंत्रालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.



कफ परेड येथील प्रस्तावित मरीना प्रकल्पाविरोधात स्थानिक पारंपरिक मच्छीमार बांधवांनी काही आक्षेप आणि हरकती नोंदवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, विकास आणि मच्छीमारांचे हित यांचा समतोल साधण्यासाठी मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 'मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड, कुलाबा' या संस्थेच्या प्रतिनिधींनी मच्छीमारांच्या समस्या मांडल्या. त्यावर मंत्री राणे यांनी कोळी बांधवांच्या सर्व शंकांवर सकारात्मक चर्चा केली.


ते म्हणाले, "मच्छीमार हा या किनारपट्टीचा मूळ रहिवासी आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान करून कोणताही विकास केला जाणार नाही. त्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करूनच प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार केला जाईल," असे राणे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस 'पदुम' (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय) विभागाचे सचिव एन. रामास्वामी आणि मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार प्रामुख्याने उपस्थित होते.




अतिवृष्टीच्या मदत वाटपातील विलंबावरून अधिकाऱ्यांची कानउघाडणी


Comments
Add Comment

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा