Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझर (Cruiser) वाहनाला स्विफ्ट डिझायर कारची (Swift Dzire Car) जोरदार धडक बसल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मालदाभाडी गावाजवळ घडली.


प्राथमिक माहितीनुसार, क्रूझरमधील (Cruiser) प्रवासी सिहोरे येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या गावी परतत असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (Swift Dzire Car) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात क्रूझरला जोरदार धडक दिली.



अपघाताची तीव्रता इतकी होती की क्रूझरमधील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच १३ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि