Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात येत असून हे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून १५ जुलैपर्यंत या पुलाचे लोकार्पण करून वाहतुकीसाठी सुरु केले जाणार आहे. त्यामुळे गोरेगावकरांना आणखी एका पुलाची भेट पुढील महिन्यात मिळणार आहे. शनिवारी ६ जुन रोजी गोरेगाव पूर्व पश्चिम जोडणाऱ्या मृणालताई गोरे विस्तारीत पुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता जोड रस्ता प्रकल्पातील गोरेगावमधील पुलाचेही लोकार्पण होणार आहे.



गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) (GMLR) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान १.२६ किलोमीटर लांबीच्‍या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, ३१ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच, एकूण ३० पैकी बहुतांशी स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. खांबांवर तुळई स्‍थापित करणे, डेक स्‍लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची अधिक कुमक उपलब्‍ध करून देण्‍याबाबत संबंधितांना निर्देश वेळोवेळी देण्‍यात आले होते. हे काम ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्‍याचे महानगरपालिकेचे उद्दिष्‍ट होते. परंतु, कंत्राटदाराने ठरविलेल्या वेळापत्रकाचे पालन न केल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे या जोड रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण जून महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित मानले जात असले तरी आता याचे काम जुलै महिन्यात पूर्ण करून १५ जुलैपर्यंत याचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे.


या पुलाच्या बांधकामामध्ये कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेविका प्रिती सातम यांनी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत वारंवार मुद्दा उपस्थित करून विकासकामे करताना स्थानिकांची गैरसोय होणार याची काळजी कंत्राटदार आणि पर्यायाने महापालिका प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. परंतु जोड रस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगावमधील या पुलाच्या बांधकामामध्ये महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे अधिकारी कोणत्याही प्रकारची नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीकोनातून कामे करत नसल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.