Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा ढग वेगाने प्रवास करत असून, त्यातून तीव्र भूचुंबकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हे भूचुंबकीय वादळ आज पृथ्वीवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेची स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर (एसडब्यूपीसी) या संस्थेने जी थ्री श्रेणीच्या (तीव्र) भूचुंबकीय वादळाचा इशारा दिला आहे.


सूर्यापासून आलेल्या

"> ऊर्जेमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात तात्पुरता व्यत्यय निर्माण होतो यालाच भूचुंबकीय वादळ असे म्हणतात. सूर्यातून निर्माण होणाऱ्या सौर ज्वालांचा उद्रेक झाल्यानंतर चुंबकीय वायूचे प्रचंड ढग आकाशात गेले जातात. यापैकी काही उद्रेक पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला स्पर्श करून पुढे जातात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नुकताच सूर्याच्या पृष्ठभागावरील सक्रिय भागातून सौर ज्वाला (सोलर फ्लेअर ) उसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात चुंबकीय वायू आणि फिलामेंट (सूर्यावरील प्लाझ्माचा पट्टा) अवकाशात फेकला गेला. हा ढग पृथ्वीच्या दिशेने सरकत असून त्याचा परिणाम पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर होऊ शकतो. हा प्लाझ्माचा ढग सुमारे १ हजार ४०० किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत आहे.



घटना काय ?
सूर्याच्या पृष्ठभागावरील ‘ऍक्टिव्ह रिजन ४४६१’ या भागातून एम १.८ श्रेणीची सौर ज्वाला उसळली. सौर ज्वाला म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर साठलेल्या चुंबकीय ऊर्जेचा अचानक आणि तीव्र स्फोट होय. या स्फोटासोबत दाट आणि चुंबकीय ‘कोर फिलामेंट’ अवकाशात फेकले गेले, ज्याची दिशा थेट पृथ्वीच्या दिशेने आहे. कोर फिलामेंट म्हणजे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात अडकलेला घनदाट प्लाझ्माचा मुख्य भाग. हा भाग तुटून अवकाशात गेला तर त्यातून शक्तिशाली सौर उद्रेक निर्माण होऊ शकतो.


परिणाम काय ?
प्लाझ्माचा ढग पृथ्वीवर थेट आदळत नाही कारण पृथ्वीभोवती मजबूत चुंबकीय कवच (मॅग्नेटोस्फिअर) असते. हे कवच आपले संरक्षण करते. मात्र हा ढग पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आल्यावर त्यात तात्पुरता व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे काही उपग्रहांच्या कार्यात तात्पुरते अडथळे निर्माण होतात तसेच जीपीएस सेवांमध्ये काही क्षण व्यत्यय येण्याची शक्यता असते.



ऑरोरा दिसण्याची शक्यता
भूचुंबकीय वादळाची तीव्रता वाढल्यास जगातील काही भागांमध्ये ‘ऑरोरा’ अर्थात आकाशातील रंगीत प्रकाशरेषा दिसू शकतात. ऑरोरा ही निसर्गातील एक अद्भुत आणि सुंदर घटना मानली जाते. हिरव्या, जांभळ्या आणि लाल रंगाचे आकर्षक प्रकाशरेषा आकाशात दिसून येतात. उत्तर भारतातील काही भागांत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे ऑरोरा दिसण्याची शक्यता अधिक असते.

Tags
nasaGeomagnetic StormSolar FlareAuroraSpace WeatherScience NewsEarth Magnetic FieldAstronomy
Comments
Add Comment

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात