Dimbhe Canal Drowning : डिंभे कालव्यात पोहण्याचा मोह जीवावर; १५ वर्षीय प्रज्वल चासकरचा बुडून दुर्दैवी अंत

MANCHAR PUNE: 'मला पोहता येते' असा आत्मविश्वास बाळगून डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डाव्या कालव्यात उडी मारलेल्या १५ वर्षीय प्रज्वल बाळासाहेब चासकर या मुलाचा बुडून मृत्यू झाला. तब्बल १६ तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह घटनेपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भेकेमळा टाकेवाडी येथे सापडला. कुटुंबातील एकुलता एक असलेल्या प्रज्वलच्या निधनाने महाळुंगे पडवळ गावात शोककळा पसरली आहे.




नेमकी घटना काय?


शनिवारी दुपारी प्रज्वल आपल्या चार मित्रांसोबत डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावर पोहण्यासाठी गेला होता. पोहण्याचा आत्मविश्वास असल्याने प्रज्वलने कालव्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो दोन वेळा बुडाला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रज्वलला वाचवता आले नाही.




१६ तासांचे थरारक शोधकार्य


घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम राबवण्यात आली. कालव्यातील पाणी ३० टक्क्यांनी कमी करण्यात आले, परंतु अंधारामुळे रात्री शोधकार्य थांबवावे लागले. रविवारी सकाळी पुन्हा शोध सुरू असताना, टाकेवाडी गावच्या हद्दीत प्रज्वलचा मृतदेह वाहत असल्याचे त्याच्या मामांना (जालिंदर पडवळ) दिसून आले. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून महाळुंगे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.




हृदयद्रावक पार्श्वभूमी: नवसाने झालेला पुत्र हरपला


प्रज्वलच्या निधनाने एक हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि नवसाने प्रज्वलचा जन्म झाला होता, त्यामुळे तो आई-वडिलांचा डोळ्यातील तारा होता. नुकताच नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रज्वल अभ्यासात हुशार व गुणी होता. शेतकरी असलेल्या त्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि