IND vs AFG Day-2 : मानवच्या फिरकीची जादू चालली, अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; कसोटीवर भारताची मजबूत पकड

न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले आहे. पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरुवातीपासूनच दबावात ठेवलं. या सामन्यात भारताकडून मानवने पदार्पण करत अफगाण फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. त्याने 16 षटकात २१ धावा देत तीन विकेट्स घेतल्या आहेत.भारताने पहिल्या डावात ८ बाद ५६४ धावांवर डाव घोषीत केला.प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली.दुसऱ्या दिवसाच खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने पाच विकेट्स गमावत ११३ धावा केल्या आहे.ते भारताच्या धावसंख्येपेक्षा ४५१ धावांनी पिछाडीवर आहेत.



गिल-पंतची भागीदारी ठरली निर्णायक


दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने ३ बाद ३६८ धावांपासून केली. कर्णधार शुभमन गिल याने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. त्याने १२६ धावांची खेळी साकारली त्यानंतर तो मोहम्मद सलामच्या चेंडूवर बाद झाला. दुसरीकडे ऋषभ पंत याने आक्रमक फलंदाजी करत ८१ धावा केल्या.दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या ५६४ धावांपर्यंत पोहोचवली.



मानवचे स्वप्नवत पदार्पण


धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानला भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर मानवने फिरकीची जादू हळू हळू दाखवली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अचूक गोलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या मधल्या फळीची वाताहात केली. त्याने अफगाणस्तानच्या तीन फलंदाजांना बाद केले. मानवच्या प्रभावी गोलंदाजीमुळे सामन्यावरील भारताची पकड घट्ट झाली आहे.



रहमत शाहची एकाकी झुंज


एकीकडे विकेट्स पडत असताना अनुभवी रहमत शाह मात्र खंबीरपणे उभा राहिला. तो ४३ धावांवर नाबाद असून अफगाणिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दुसऱ्या टोकाला त्याला पुरेशी साथ मिळालेली नाही.



भारत विजयाच्या दिशेने


पहिल्या डावातील प्रचंड धावसंख्या त्यानंतर मोठी सुरुवात करुन देण्यात भारतीय संघाला यश आले आहे.तिसऱ्या दिवशी भारताचे लक्ष्य अफगाणिस्तानचा उर्वरित डाव लवकर आटोपून मोठी आघाडी मिळवण्याकडे असेल.सध्या सामन्याची सर्व सूत्रे भारताच्या हातात असून पदार्पणवीर मानवची प्रभावी गोलंदाजी भारतासाठी फायद्याच ठरली आहे.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या