पहिला पाऊस


मनस्विनी: पूर्णिमा शिंदे


येरे येरे पावसा... खूप सुंदर कविता. तुमच्या आमच्या बालपणातील. उन्हाच्या झळांनी लाहीलाही करणारी दयनीय अवस्था होते पृथ्वीची, आपली. आपल्या सर्व अंगाची दाहकता अन् कासावीस जीव पाणी पाणी करत असतो. पावसाच्या प्रतीक्षेत पावश्या पक्षाची गोड शीळ घुमते रानावणी. किती अवीट गोडी! त्या साद घालणाऱ्या पक्षाला तुम्ही ऐकलंच असेल. क्षणोक्षणाला वाटते जरा झाकळले. नभ दाटून आलेत. आकाश निरभ्र झाले. वाटते पाऊस येईल. आता कोणत्याही क्षणी पाऊस येईल. सर्व पर्जन्य राजाची वाट पाहत असले तरी जून महिना येतो आणि या पर्जन्य ऋतूमध्ये पावसाचा वर्षाव होतो. या वर्षावाने त्या सुखद गारव्याला आसुसलेल्या वसुंधरेचे जणू रूपच पलटून जाते कसे! तिचा जो नवा लूक नववधूसारखा जणू नवीन नवरी कोवळी. हिरवा कंच शालू पांघरून गोड गोजिरी दिसते खरी. मोहक, सुंदर रूप बहरलेले ती बेभान धुंद होऊन डवरते, त्यावर विविध रंगी फुले येतात, बहरतात, परिसर सुगंधित करतात. सारा आसमंत क्षणात हिरवागार होतो आणि महकतो. मोहक दिसतो. हे फक्त त्याच्या आगमनानंतरच होतं बरं का...आपल्याही रोजच्या जीवनात अामूलाग्र बदल घडत असतो. क्षणाक्षणाला मोहवणारा तो गारवा. त्याची उत्कटता, तो मृदगंध... पहिल्या पावसात भिजलेली माती जणू अत्तराच्या कुपीप्रमाणे सुंदर सुवासिक बनते. हे अत्तर कुठेच मिळत नाही. निसर्गाची किमया भुरळ पाडणारीच. पृथ्वीवरील सारे ताजेतवाने होतात. वन्यजीवनही बदलून जाते. पावसाच्या थेंबांची रिमझिम ते संततधार ते मुसळधार सुसाट वाऱ्यापर्यंत. अवघे वातावरण पुलकित होते. प्रसन्नता देऊन जाते. मन नाचू बागडू लागतं. पशुपक्षी, प्राणी इतकंच काय माणूस, प्राणी! तोसुद्धा त्यात आलाच. पहिल्या पावसात तनमन सुखावून जाणारा. झाडेझुडपे आसुसलेली, वृक्षवेली नटलेल्या, रस्ते नाले, कौले, भिंती, घर, प्रत्येक वास्तूत चराचरात प्रफुल्लित करणारा असा हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा पाऊस.


खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा बळीराजा... माझा शेतकरी राजा... त्याचं सर्व जीवन या पावसावरच अवलंबून असतं. आणि म्हणून तो आकाशाकडे, आभाळाकडे डोळे लावून पाऊस कधी येणार? या प्रतीक्षेत असतो. पेरणी कधी करायची, बी बियाणे पेरायचे मग त्यासाठी पाऊस यायलाच हवा. आणि प्रतीक्षेत असताना पाहता पाहता पाऊस येतो सुद्धा. त्याच्याचमुळे पेरलेलं बी उगवतं आणि उगवलेल्या धान्यात छोटे छोटे सुंदर तन रुजू लागतात. नाजूक रोपं येतात. रानमळ्यामध्ये पावसाच्या आगमनाने केलेली ही किमया खरोखरच न्यारी आहे. अद्भुत आहे. निसर्गाची किमया परिवर्तन घडवते. आयुष्यावरही खूप प्रमाणात फरक पडतो. हा जो बदल आहे, हा सृष्टीचा बदल, ऋतूंचा बदल, निसर्गाचा बदल आणि या बदलात माणूस खूप काही शिकत असतो. म्हणून पेरणी महत्त्वाची असते मग ती विचारांची असो किंवा धान्याची पेरित राहा.प्रेमी युगल, मानव, पशुपक्षी, प्राणी सगळे धुंद होऊन बागडतात.गायक गाणी गातात. नृत्य कलाकार नृत्य करतात. कवी मन वेडेपिसे होते. कविता लिहू लागतात. आंतरिक स्फूर्तीतून त्यांना त्या कविता सुचत जातात आणि अक्षरे उमटत जातात. त्यांच्या ठायी रसिकता जागृत होते.पाऊस ओला, पांघरून आला हिरवा शेला पाऊस बेधुंद, उधळे मृदगंध बरसते सुगंधपाऊस बेभान, हरपूनी भान पेरतो चैतन्याचा रान पाऊस पहिला, सृष्टीस बिलगला हिरव्या मृगातला पाऊस चैतन्य चिंब करी तनमन,सुखावतो आपण. पाऊस गाण्यातील तान पाऊस रान, डुले पान न पान या अशा पावसाने आनंद, हर्ष, उल्हास वाढीस लागतो. स्फूर्ती, प्रेरणा मिळत जाते. निसर्ग राजा चैतन्यमय होऊन हिरवागार फुलतो, नद्या वाहू लागतात, धबधबे, झरे ओसंडू लागतात. खूप काही ताजतवान होतं. पावसाच्या आगमनाने जनजीवन धुंद होऊन बेभान होते. म्हणूनच म्हटले आहे.
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा..

बालपणीची कविता खूप काही सांगून जाते. पैसा पावलोपावली लागतोच. सगळ्यांना द्यावा लागतो. तसा पावसा तुलाही देतो. तु लवकर ये, अशी एक गंमत यामध्ये दिसून येते.सर आली धावून, मडके गेले वाहूनआता हे मडके वाहून गेलं. सुरेख कल्पना आहे. पाषाणातून सुद्धा पाण्याचे धबधबे वाहू लागतात. उष्मा जाऊन वर्षा ऋतूचे आगमन होते. अवघ्या सृष्टीला भुरळ पाडतो, धुंद करतो, बेभान करतो असा हा पाऊस. पावसासारखं जगता आलं पाहिजे. बरसून... तर कधी रिमझिम सरी... धुंद गारवा... इतरांना सुखवून जगता आलं पाहिजे.या पावसात आपण एक संदेश घेऊ या का! पावसाच्या आगमनाने राग, लोभ,अहंकार, धुंदी, व्यसन, भ्रष्टाचार, महागाई, फसवणूक, लुटालूट ही सगळी कीड या पावसात पूर्णपणे धुऊन जाऊ दे आणि माणसातील माणूस पण पुन्हा एकदा आनंदाने माणुसकीने बहरू दे. अवघ्या सृष्टीवर, सर्वांवर प्रेमाचा पाऊस बहरू दे. आजच्या या पावसाकडे आपण सुंदर मागणं मागूया.
Comments
Add Comment

नको त्या संगतीत ‘टीनएजर्स’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन

लोकमाता अहिल्याबाई होळकर

स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या

‘कर चले हम सलाम…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती

कदाचित हा तूमचा अखेरचा चित्रट ठरु शकतो

स्मृतीपटल : अनिल तोरणे  अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच ठरलेल्या वेळी चित्रपटाच्या सेटवर हजर राहणाऱ्या

‌‘समते‌’त ‌‘समता‌’ शोधण्याचा प्रयत्न

  वेध: आरिफ शेख भारतीय समाजात आरक्षण हा विषय जितका राजकीय आहे, तितकाच तो भावनिक आणि ऐतिहासिकही आहे. आरक्षणाच्या

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला खोल जखम

नोंद-भागा वारखडे देशात दर वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न केवळ करिअरचे नसते, तर