Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात आणि तरुणाईमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आयोजकांविरोधात चौकशी सुरू केली आहे. ताडदेव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR क्रमांक 17/2026) करण्यात आली असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. (Eknath Shinde)


प्राथमिक माहितीनुसार, वृषभ गांगुर्डे हा तरुण कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. कार्यक्रम सुरू असतानाच त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Eknath Shinde)


याच कार्यक्रमादरम्यान आणखी एका ३१ वर्षीय महिलेची प्रकृतीही बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्ञान रे असे तिचे नाव असून तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस चौकशीत तिने कार्यक्रमादरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याचे सांगितले आहे. मात्र, अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Eknath Shinde)



मृत्यू झालेला वृषभ गांगुर्डे हा कायद्याचे शिक्षण घेत होता. त्याने कोलकात्यातून वकिलीचे शिक्षण घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कॉन्सर्टचे आयोजन ‘स्पेसबाउंड’ या कंपनीने केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्तीकडून सुमारे ४ हजार रुपयांचे तिकीट आकारण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Eknath Shinde)


दरम्यान, पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू केली आहे. आयोजक कंपनीतील संबंधित सदस्यांचीही चौकशी केली जात असून मृत्यूमागील खरे कारण समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Eknath Shinde)


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. “या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे शिंदे यांनी सांगितले. तसेच यापूर्वी गोरेगावमधील प्रकरणातही पोलिसांनी सखोल तपास करून कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)



या घटनेमुळे मुंबईतील मोठ्या कॉन्सर्ट्समधील सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde)

Comments
Add Comment

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम