Ek Nath Shinde : कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पोलीस वसाहत पुनर्विकासासह रखडलेल्या कामांना गती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


कुर्ला फेस्टिव्हलचे आयोजक आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्याचे कौतुक


स्थानिक कलाकारांना मिळालेल्या व्यासपीठाचेही गौरवोद्गार


मुंबई : कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित ‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करताना, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा कुर्ला फेस्टिव्हल अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे सांगितले.लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकर यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून कुर्ला फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. जय मंगेश कुडाळकर, विनोद कांबळे, शालिनीताई सुर्वे, उज्वला शहा, राजा चौगुले, उपनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाताई शिंदे, सगुन नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


सलग २४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करूनही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम राहणे ही मोठी बाब असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, कुर्ला फेस्टिव्हल अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. सर्व स्तरातील नागरिक या महोत्सवाचा आनंद घेत आहेत.सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ येथे उपलब्ध झाले आहे. अशा महोत्सवांमधूनच उद्याचे चांगले कलाकार घडत असतात.या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बचत गटांचे स्टॉलही उभारण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांना आधार देणारी योजना असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे हे सरकार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.यावेळी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, न बोलता काम करणारे नेतृत्व आजच्या काळात दुर्मिळ आहे. कुडाळकर यांनी मतदारसंघात विविध विकासकामे आणली असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. म्हणूनच मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विधानसभेत पाठविले आहे.


मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात नागरिकांना विरंगुळ्याचे आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. कुर्ला फेस्टिव्हल त्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम हा महोत्सव करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.नेहरूनगर, कुर्ला पूर्व येथील पोलीस वसाहतीतील १९ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून सुमारे ५८० कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. या वसाहतीचा म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रात्रंदिवस काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यास शासन प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री असताना पोलिसांना घरे देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनातील सर्वजण टीमवर्कच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.नेहरूनगर आणि टिळकनगर परिसरातील मलनिस्सारण वाहिनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी दुसरा टप्पा रखडला असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात तातडीने महापालिका आणि म्हाडा अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम सुरू करण्याचे निर्देश देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.



मतदारसंघातील लोकहिताचे, सर्वसामान्यांना दिलासा देणारे आणि विकासाला चालना देणारे कोणतेही प्रकल्प निधीअभावी थांबणार नाहीत, अशी ठाम ग्वाही देताना शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, क्लस्टर योजना, एसआरए योजना तसेच अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.कुर्ला फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)