LPG Price : देशांतर्गत एलपीजी महागला पण जगाच्या तुलनेत भारतात स्वस्तच

नवी दिल्ली / मुंबई : पश्चिम आशियातील भू-राजकीय संकट आणि इराण-अमेरिका-इस्रायल दरम्यान भडकलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या जागतिक दबावामुळे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी रविवारपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. चालू वर्षातील ही दुसरी मोठी दरवाढ असून, यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. असे असले तरी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जागतिक संकटाच्या तुलनेत भारतातील घरगुती गॅसचे दर शेजारील देश आणि अमेरिका, कॅनडासारख्या प्रगत अर्थव्यवस्थांपेक्षा अजूनही खूप कमी आहेत.पश्चिम आशियातील संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असली, तरी भारतातील घरगुती स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) शेजारील देश आणि अमेरिका, कॅनडासारख्या प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अजूनही खूप स्वस्त आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने रविवारी दिली आहे. तसेच पेट्रोलियम मंत्रालयाने इंधनाचा जपून वापर करण्याचे आणि ऊर्जा-कार्यक्षम स्वयंपाक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.


रविवारपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीत सामान्य ग्राहकांसाठी १४.२ किलोचा सिलेंडर ९४२ रुपये झाला आहे, तर 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या लाभार्थ्यांना तो केवळ ६४२ रुपयांना पडत आहे. वास्तविक पाहता, आंतरराष्ट्रीय दरवाढीमुळे एका सिलेंडरचा पुरवठा खर्च (सप्लाय कॉस्ट) १,६०० रुपयांच्या पार गेला आहे. हॉटेल आणि व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅसचे दर दरमहा आंतरराष्ट्रीय बाजारानुसार थेट बदलतात. दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर ३,११३.५० रुपये (सुमारे १६४ प्रति किलो) आहे, तर घरगुती ग्राहक सुधारित दरानंतरही केवळ ६६ प्रति किलो दराने गॅस खरेदी करत आहेत.



उज्ज्वला लाभार्थ्यांना दिलासा


सामान्य ग्राहकांसाठी दिल्लीत गॅस ९४२ झाला असला, तरी 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या १०.५८ कोटी लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर ३०० रुपयांची सबसिडी मिळत असल्याने, हा सिलेंडर त्यांना केवळ ६४२ (प्रभावी किंमत) मध्ये पडत आहे.



'हॉर्मुझ खाडी' बंद पडल्याचा फटका


भारताला गरजेचा ६० टक्के एलपीजी आयात करावा लागतो, ज्यातील ५४ टक्के पुरवठा 'हॉर्मुझच्या खाडी'तून होतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये संकट सुरू होण्यापूर्वी सौदी एलपीजीचा दर ५४३ डॉलर प्रति टन होता, जो जूनमध्ये तब्बल ४६ टक्के वाढून ७९० डॉलर प्रति टन झाला आहे. या आंतरराष्ट्रीय दरवाढीमुळे एका घरगुती सिलेंडरचा खरा पुरवठा खर्च (सप्लायं कॉस्ट) १,६०० च्या पार गेला आहे. ग्राहकांना तो ९४२ मध्ये दिला जात असल्याने, तेल कंपन्यांना आजही प्रत्येक सिलेंडरमागे सुमारे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ही दरवाढ कंपन्यांचे नुकसान अंशतः भरून काढण्यासाठी करण्यात आली आहे.



व्यावसायिक सिलेंडरच्या किमती ६ महिन्यांत दुप्पट


या वेळेस १९ किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आलेला नाही आणि दिल्लीत तो ३,११३.५० वर स्थिर आहे. मात्र, गेल्या ६ महिन्यांचा विचार केल्यास व्यावसायिक सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. १ जानेवारी रोजी जो सिलेंडर १,५८० होता, तो १ जून रोजी ३,११३.५० वर पोहोचला आहे. यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर आधीच वाढले आहेत.



६० हजार कोटींचा बोजा


ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने गेल्या आर्थिक वर्षात घरगुती एलपीजीवर तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा स्वतः सोसला आहे. तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले आहे. राजनैतिक पातळीवर भारताने हॉर्मुझ खाडीवरील अवलंबित्व कमी करत अमेरिका, कॅनडा आणि अल्जेरियासारख्या देशांमधून पर्यायी आयात सुरू केली आहे. तसेच, देशांतर्गत उत्पादन ३२ टीएमटीवरून थेट ५२ टीएमटीपर्यंत वाढवले आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी होणारा काळाबाजार रोखण्यासाठी डिलिव्हरीच्या वेळी ९० टक्के ओटीपी आधारित पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे.



जागतिक बाजारातील किमती आणि भारताची तुलना (१४.२ किलो सिलेंडर)


पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतामध्ये सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार स्वतः सोसत आहे. जगातील इतर प्रमुख देशांमधील गॅसच्या किमती भारतापेक्षा जास्त आहेत.



देश १४.२ किलो सिलेंडरची किंमत (भारतीय रुपयात)


भारत (उज्ज्वला लाभार्थी) ६४२
भारत (सामान्य ग्राहक) ९४२
पाकिस्तान १,०४६
नेपाळ १,२०७
बांगलादेश १,२२५
श्रीलंका १,२४१
अमेरिका १,७५५
ऑस्ट्रेलिया १,७६५
कॅनडा २,४११



भारतातील प्रमुख शहरांतील LPG च्या घरगुती सिलेंडरचे दर


मुंबई: ९४१
दिल्ली: ९४२
चेन्नई: ९५७.५०
कोलकाता: ९६८
बंगळुरु: ९४४.५०
हैदराबाद: ९९६
लखनऊ: ९८०
पाटणा: १,०३१.५०

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग