NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात कल्याण कनेक्शन; विद्यार्थिनीची सीबीआयकडून चौकशी

कल्याण : नीट पेपरफुटी(NEET Paper Leak Case) प्रकरणातील तपासाचे कनेक्शन आता थेट कल्याणपर्यंत पोहोचले आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासादरम्यान सीबीआय (Central Bureau of Investigation) (CBI) ने कल्याणमधील एका विद्यार्थिनीची चौकशी केली आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत पोहोचल्याने तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईची शहरात मोठी चर्चा सुरू असून संबंधित विद्यार्थिनीची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान कल्याणजवळील म्हाराळ परिसरात ही कारवाई करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या विशेष पथकाने थेट विद्यार्थिनीच्या घरी भेट देत तिचा जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. या महाघोटाळ्याचे धागेदोरे यापूर्वी अनेक राज्यांमध्ये सापडले होते. मात्र, सीबीआयची थेट कल्याणमध्ये झालेली एन्ट्री प्रकरणाचे गांभीर्य अधिक अधोरेखित करणारी मानली जात आहे. या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनी किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांचा नेमका संबंध काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तपास यंत्रणेने थेट घरी जाऊन चौकशी केल्याने स्थानिक स्तरावर विविध चर्चांना उधाण आले आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी एका अशा विद्यार्थ्याच्या नियमित संपर्कात होती, जो आधीपासूनच तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. सीबीआयने त्या संशयित विद्यार्थ्याचे Call Details Records (CDR) आणि संपर्कांची पडताळणी केली असता कल्याणमधील या विद्यार्थिनीचा संपर्क क्रमांक(Mobile Number) समोर आला.



याच संपर्काच्या धाग्यावरून सीबीआयचे पथक थेट कल्याणमध्ये पोहोचले आणि विद्यार्थिनीची सविस्तर चौकशी केली. या कारवाईनंतर तपासाला आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. माझी मुलगी एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या संपर्कात होती. त्यातूनच तिचा मोबाईल नंबर तपास यंत्रणांच्या निदर्शनास आला, असे त्यांनी सांगितले.



तसेच, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन केवळ प्राथमिक चौकशी केली असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यापुढे भाष्य करण्यास नकार दिला. विद्यार्थिनीचा त्या संशयिताशी केवळ संपर्क होता की NEET Paper Leak Racket मध्ये तिचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग आहे, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते