रायगड :
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा आजही स्वराज्याचा गौरव आणि प्रेरणेचे प्रतीक मानली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj's Coronation Day) किल्ले रायगडावर (Raigad Fort) शिवभक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच दऱ्याखोऱ्यांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून संपूर्ण गड शिवमय आणि भगवामय झाला आहे.
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांनी रायगड परिसर दुमदुमून गेला आहे. भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे रायगडावरील प्रत्येक कडा स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देताना दिसत आहे. शिवभक्तांच्या या अथांग गर्दीचे विहंगम दृश्य टिपणारा ड्रोन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली असून महापौर रितू तावडे यांनी आज एकाच ...
दरम्यान, ६ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गडावर ११९८पोलीस कर्मचारी, १५० पोलीस अधिकारी, ३ आरसीपी, एक एसआरपी टीम, ड्रोन कंट्रोल टीम यासह अन्य अधिकारी वर्ग तैनात असणार आहेत अशी माहिती आहे. रायगडावर पायरी मार्गावर देखील पोलीस तैनात केले जाणार आहेत. पार्किंगचा परिसर ते किल्ले रायगड अशी पोलिसांची विशेष टीम या ठिकाणी असणार आहे.





