R Praggnanandhaa : बुद्धिबळाच्या पटावर भारतीय वर्चस्व! कार्लसनच्या घरात घुसून प्रज्ञानंदाने जिंकला नॉर्वे चेसचा मुकुट

- आर प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी! विश्वनाथन आनंदांनाही जमले नाही, ते प्रज्ञानंदाने करून दाखवले!


भारतीय बुद्धिबळाचा युवा तारा आर. प्रज्ञानंदाने (R Praggnanandhaa) जागतिक बुद्धिबळ विश्वात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नॉर्वे चेस २०२६ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत त्याने इतिहास रचला असून, या प्रतिष्ठित स्पर्धेचा किताब जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरचा पराभव करत प्रज्ञानंदाने हा ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावावर केला.


स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी प्रज्ञानंदा (R Praggnanandhaa) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक क्षणी त्याने आपल्या अनुभव, संयम आणि आक्रमक खेळीचे शानदार प्रदर्शन करत पारंपरिक सामन्यात विजय मिळवला. या विजयामुळे त्याच्या खात्यात तीन महत्त्वाचे गुण जमा झाले आणि तो १८ गुणांसह थेट अव्वल स्थानावर पोहोचला. (R Praggnanandhaa)



या यशामागे प्रज्ञानंदाची (R Praggnanandhaa) सातत्यपूर्ण कामगिरी आणि धाडसी खेळ निर्णायक ठरला. विशेष म्हणजे, त्याने स्पर्धेदरम्यान जगातील अव्वल बुद्धिबळपटू आणि नॉर्वेचा स्टार खेळाडू मॅग्नस कार्लसनला तब्बल दोन वेळा पराभूत केले. कार्लसनच्या कारकिर्दीत एका स्पर्धेत त्याला दोनदा हरवणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये आता प्रज्ञानंदाचाही समावेश झाला आहे. या विजयांनीच त्याच्या विजेतेपदाचा पाया भक्कम केला.


अवघ्या २० वर्षांच्या प्रज्ञानंदासाठी (R Praggnanandhaa) हा विजय अत्यंत खास मानला जात आहे. नॉर्वे चेस ही जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक समजली जाते. विशेष बाब म्हणजे भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनाही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नव्हते. त्यामुळे प्रज्ञानंदाने मिळवलेले यश भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरत आहे.


स्पर्धेच्या सुरुवातीला प्रज्ञानंदाची (R Praggnanandhaa) कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. काही फेऱ्यांनंतर तो विजेतेपदाच्या शर्यतीत मागे पडल्याचे दिसत होते. मात्र त्याने हार न मानता दमदार पुनरागमन केले. सलग चार पारंपरिक सामने जिंकत त्याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि अखेर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.



गेल्या काही वर्षांत भारतीय युवा बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. विश्वविजेता डी. गुकेश, अर्जुन एरिगैसी आणि प्रज्ञानंदा यांच्यासारखे खेळाडू सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. प्रज्ञानंदाच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय बुद्धिबळाचे वाढते वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (R Praggnanandhaa)


मॅग्नस कार्लसनच्या घरच्या मैदानावर, जगातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत मिळवलेले हे विजेतेपद प्रज्ञानंदाच्या (R Praggnanandhaa) कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. भारतीय क्रीडाविश्वासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरला असून, देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन

Asian Games : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तेजस शिर्से आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला 'स्ट्रेस फ्रॅक्चर'च्या

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त