- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी' महामंडळाच्या उत्पन्नाला खिळ घालणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही खासगी वाहनाला उभे राहून प्रवासी भरण्यास किंवा उतरविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत राज्यभर 'विशेष अंमलबजावणी मोहीम' राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अनधिकृत वाहनधारकांवर आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा व दक्षता विभागाने जारी केले आहेत. (Minister Pratap Sarnaik) एसटी बसस्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर खासगी वडाप, ट्रॅव्हल्स, रिक्षा आणि इतर अवैध वाहनांनी वेढा घातल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. तसेच यामुळे प्रवाशांची ओढाताण होऊन एसटीच्या अधिकृत महसुलाचे प्रचंड नुकसान होते. या गंभीर समस्येची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बसस्थानक परिसरात अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे औपचारिक उपक्रम म्हणून न पाहता, एसटीच्या हितसंरक्षणाची मुख्य जबाबदारी म्हणून काम करावे", असेही त्यांनी सांगितले. (Minister Pratap Sarnaik)
Toxic Liquor Case : विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; १.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त
फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरातील कथित मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि ...





