Crime News : रात्री वडिलांनी चापट मारली, घरात सकाळी भयानक दृश्य समोर आलं, मॅकेनिकल इंजिनिअर मुलाचं वडिलांसोबत भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला जास्त जीव लावला जातो, हा राग मनात धरून एका मॅकेनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) मुलाने स्वतःच्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेवासे (Nevase) रस्त्यावरील अशोकनगर फाटा परिसरात ही थरारक घटना घडली असून संपूर्ण परिसर हादरला आहे.




डोक्यात टिकाव घालून वडिलांचा खून


मृत व्यक्तीचे नाव सचिन ढोकचौळे (Sachin Dhokchoule) असे असून, त्यांचा मुलगा प्रणव ढोकचौळे यानेच त्यांच्या डोक्यात टिकाव घालून खून केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, आरोपी प्रणव ( Pranav Dhokchoule ) हा मॅकेनिकल इंजिनिअर असून काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील नोकरी सोडून गावी परतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ढोकचौळे हे पत्नी भारती यांच्यासोबत राहत होते. त्यांना दोन मुलं असून मोठा मुलगा प्रणव इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा संकेत छत्रपती संभाजीनगरमध्ये ( Chhatrapati Sambhajinagar ) शिक्षण घेत आहे.


घटनेच्या दिवशी सकाळी सचिन ढोकचौळे हे घरातील हॉलमध्ये झोपलेले होते. त्याचवेळी कुटुंबातील सदस्य बाहेर अंगणात काम करत होते. काही वेळाने भारती ढोकचौळे घरात आल्या असता पतीच्या डोक्याजवळ रक्त आणि गंभीर जखम दिसली. बाजूलाच टिकाव पडलेला होता. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीय धावत आले. मात्र तोपर्यंत सचिन ढोकचौळे यांचा मृत्यू झाला होता. (Ahilyanagar Crime News)




पप्पांनी मला चापट मारली होती, त्याचाच राग होता


धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी प्रणवनेच गुन्ह्याची कबुली दिल्याचं समोर आलं आहे. “तुम्ही लहानपणापासून लहान भावावर जास्त प्रेम करता, रात्री पप्पांनी मला चापट मारली होती, त्याचाच राग होता,” असं सांगत त्याने वडिलांच्या डोक्यात टिकाव मारल्याचं म्हटलं.


या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भारती ढोकचौळे यांच्या फिर्यादीवरून प्रणवविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी प्रणवच्या वागणुकीवरून तो मानसिक आजाराने त्रस्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वैद्यकीय तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.

Comments
Add Comment

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला