Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणात मोठे खुलासे! पाकिस्तानी मौलवींचे व्हिडिओ दाखवले अन...

Nashik TCS Case : नाशिकमधील TCS कार्यालयातील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात आता नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, महिला कर्मचाऱ्यांना पूर्वनियोजित पद्धतीने ‘टार्गेट’ करत त्यांच्यावर धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.




मंदिरात जाणे बंद कर तस्बीह वाच


पीडित महिलांपैकी एका महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर दावे केले आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, आरोपींनी 'मानसिक ताण' कमी करण्याच्या बहाण्याने तिच्या दुर्बलतेचा फायदा घेतला. एक आरोपी दानिश शेख (Danish Sheikh) , जो आधीच विवाहित आहे, त्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण (sexual abuse) केले. जेव्हा पीडितेला तिच्या भविष्याबद्दल भीती वाटू लागली, तेव्हा आरोपी म्हणाला- घाबरू नकोस, विश्वास ठेव, अल्लाह आपल्यासोबत आहे. देवाचे भजन ऐकणे आणि मंदिरात जाणे बंद कर. ताण कमी होईल. नंतर त्याने तस्बीह वाचायला सांगितले.पीडितेनुसार, त्याने (शेखने) सांगितले, तू जितके जास्त अल्लाहचे नाव घेशील, तुझे पाप माफ होत जातील आणि तुझी चांगली कर्मे वाढतील. (Nashik TCS Case)




पाकिस्तानी मौलवीचे व्हिडिओ दाखवले


आरोपपत्रानुसार, पीडितेला पाकिस्तानी (Pakistan) इस्लामिक मौलवी तारिक जमील, तसेच झाकीर नाईक आणि डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडिओ पाहण्यास सांगितले जात होते. इस्लामबद्दल माहिती मिळावी यासाठी हे व्हिडिओ दाखवले जात असल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, विवाहित असलेल्या एका आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण केले. इतकेच नव्हे तर तिच्या बँक खात्यांची माहिती आणि UPI PIN पर्यंत मिळवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.



आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता


तपासात असेही समोर आले आहे की आरोपी नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना ‘टार्गेट’ करत असत. विशेषतः कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावातून जाणाऱ्या महिलांना जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय SIT ने व्यक्त केला आहे.


या प्रकरणात ९ महिलांनी तक्रारी दाखल केल्या असून आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून संभाव्य ‘टार्गेट’वर चर्चा केल्याचाही आरोप आहे. पोलिसांकडून डिजिटल पुरावे तपासले जात असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून