मुंबई : ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, या वर्षात जानेवारी महिन्यापासून ते ४ जून २०२६ पर्यंत भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संपत्तीत तब्बल ३०.७ अब्ज डॉलर्सची बंपर वाढ झाली आहे. गौतम अदाणी यांच्या संपत्ती झालेली वाढ तर लक्षणीय आहेच, पण दररोज सरासरी १८९७ कोटी रुपयांची कमाई करत त्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. याउलट, हाच काळ मुकेश अंबानी यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरला असून त्यांना या वर्षात आतापर्यंत त्यांचे २१.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, म्हणजेच त्यांनी दररोज सरासरी १३५२ कोटी रुपये गमावले आहेत.रोजच्या कमाईच्या जोरावर गौतम अदाणी यांनी पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदाणी आता १९व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर मुकेश अंबानी त्यांच्यापेक्षा एक पायरी खाली घसरून २०व्या क्रमांकावर आले आहेत. जून २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, अदाणी पोर्टफोलिओचा ऑपरेटिंग प्रॉफिट ९४,८३४ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. अदाणी ग्रुपने पायाभूत सुविधा आणि ग्रीन एनर्जी या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, समूहाची वार्षिक गुंतवणूक १.५३ लाख कोटी रुपये आहे. ही गुंतवणूक कोणत्याही भारतीय कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना संख्याबळाचा विसर; पुणे काँग्रेसकडून आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक ...






