Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईला यश

'उबाठा'चे उमेदवार बाळ माने यांची माघार; कोकण विधानपरिषदेची निवडणूक होणार बिनविरोध


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिलेले असतानाच कोकणच्या राजकारणात मोठा 'ट्विस्ट' पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (उबाठा) अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे भाजप संपर्क प्रमुख नितेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा राजकीय चमत्कार घडला असून, बाळ माने थेट नितेश राणे यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. माने यांच्या माघारीमुळे आता कोकण विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.



अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दुपारी स्वतः नितेश राणे हे बाळ माने यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तेथे माने यांनी अधिकृतपणे माघार घेतल्याचे जाहीर केले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुशीवर नाराजी व्यक्त केली. माने म्हणाले, "उमेदवारी अर्ज भरताना सूचक म्हणून मला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मिळाल्या नाहीत. मविआतील घटक पक्षांकडून मला कोणतीही राजकीय साथ लाभली नाही. पक्षाचे मतदार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी काही मंडळी चक्क तीर्थयात्रेला निघून गेली आहेत, त्यामुळे मला मतदारच भेटत नव्हते. अशा परिस्थितीत मी काय करणार? मला या निवडणुकीत होणारा संभाव्य घोडेबाजार टाळायचा होता, म्हणूनच मी नाईलाजाने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे."

माने यांनी देवाभाऊंच्या शब्दाचा मान राखला - नितेश राणे


या संपूर्ण घडामोडींवर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, "मी येथे महायुतीचा एक अधिकृत प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून आलो आहे. बाळ माने हे माजी आमदार असून अनुभवी नेते आहेत, त्यांना बरे-वाईट सर्व समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता राज्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही हे आता सर्वांना पटू लागले आहे. माने यांनी आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि मविआतील परिस्थिती ओळखून हा अत्यंत समजूतदार निर्णय घेतला," असे राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Ind vs SL 2nd Test Rishabh Pant : ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम; दुखापतीनंतर मैदानात परतत धोनीचा विक्रम मोडला!

Colombo : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या खेळाच्या जोरावर इतिहास रचला

Nashik News : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, पालकमंत्री महाजनांचा एसटीने प्रवास

Nashik News : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. त्यानिमित्ताने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर

Chhatrapati Sambhajinagar Suicide : "तुमच्या पुढच्या सात पिढ्या यातना भोगतील..." मृत आईच्या त्या शेवटच्या शापाने उघडकीस आले कौटुंबिक वादाचे सत्य?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा

Jalgaon Crime News : खाकीचा माज ? महिला व तिच्या मुलीला मारहाण, पोलीस शिपाई अखेर अटकेत

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथे महिला