Two Eclipses In 15 Days : एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण; ऑगस्ट २०२६ मध्ये दुर्मिळ खगोलीय योग!

मुंबई : वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन मोठ्या खगोलीय घटना ऑगस्ट २०२६ मध्ये अनुभवायला मिळणार आहेत. अवघ्या दोन महिन्यांनंतर १५ दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण (Lunar eclipse) एकाच महिन्यात घडणार आहे. १२ ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण आणि २८ ऑगस्टचे चंद्रग्रहण जगातील विविध भागांतून पाहता येणार असून, खगोलप्रेमी आणि संशोधकांसाठी हा विशेष काळ ठरणार आहे.


ऑगस्ट २०२६ मध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने होणारी ही दोन्ही ग्रहणं केवळ योगायोग नसून त्यामागे अचूक खगोलीय गणित कार्यरत असते. पूर्वीच्या काळात ग्रहणांकडे भीती आणि अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहिले जात असे. मात्र आधुनिक विज्ञानानुसार ग्रहण या सावल्यांमुळे घडणाऱ्या नैसर्गिक आणि पूर्वनियोजित खगोलीय घटना आहेत. वैज्ञानिक भाषेत या कालावधीला ‘इक्लिप्स सीजन’ (Eclipse Season) असे म्हटले जाते.



पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या तुलनेत सुमारे ५ अंशांनी झुकलेली असल्यामुळे प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. ज्या ठिकाणी या दोन कक्षा एकमेकांना छेदतात, त्या बिंदूंना ‘नोड्स’ (Nodes) म्हणतात. चंद्र जेव्हा या नोड्सच्या जवळून प्रवास करतो, तेव्हा ग्रहण घडण्याची शक्यता निर्माण होते. हा अनुकूल कालावधी सुमारे ३४.५ दिवसांचा असतो आणि त्यालाच ‘इक्लिप्स सीजन’ म्हणतात. त्यामुळेच एकाच महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अनुभवायला मिळते.


या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. चंद्र पृथ्वीच्या तुलनेत अशा स्थितीत येतो की तो सूर्याचा प्रकाश पूर्णपणे झाकून टाकतो. या घटनेला ‘खग्रास सूर्यग्रहण’ (Total Solar Eclipse) असे म्हणतात. वैज्ञानिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते.


सूर्याचा सर्वात बाहेरील थर ‘कोरोना’ (Corona) म्हणून ओळखला जातो. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे हा थर सामान्यतः दिसत नाही. मात्र खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत असल्याने शास्त्रज्ञांना सौर कोरोनाचा प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आणि विविध उपकरणांच्या साहाय्याने सखोल अभ्यास करता येतो. सूर्यग्रहणाच्या काळात काही मिनिटांसाठी दिवसाही अंधाराचे वातावरण निर्माण होते. विविध वैज्ञानिक अभ्यासांनुसार या काळात तापमानात अचानक घट नोंदवली जाते. तसेच पृथ्वीच्या आयनोस्फियर (Ionosphere) थरामधील रेडिओ लहरींच्या हालचालींवरही त्याचा परिणाम होतो.



सूर्यग्रहणानंतर नेमके पंधरा दिवसांनी पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ (Partial Lunar Eclipse) घडेल. २८ ऑगस्ट रोजी होणारे हे ग्रहण ‘दीप खंडग्रास’ (Deep Partial Lunar Eclipse) स्वरूपाचे असेल, कारण चंद्राचा तब्बल ९६ टक्के भाग पृथ्वीच्या गडद सावलीत म्हणजेच ‘अम्ब्रल शॅडो’ (Umbral Shadow) मध्ये झाकला जाईल.


हे पूर्ण चंद्रग्रहण नसले तरी चंद्राचा शहाण्णव टक्के भाग सावलीत गेल्यामुळे तो गडद तांबूस किंवा काजळीसारखा दिसू शकतो. विज्ञानात या प्रक्रियेला ‘रेले स्कॅटरिंग’ (Rayleigh Scattering) असे म्हटले जाते. पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना सूर्यप्रकाशातील तांबड्या रंगाच्या किरणांचे अपवर्तन होऊन ते चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्राला हा वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त होतो.

Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम