मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुष्पा पार्कजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली. भरधाव बेस्ट बसने (BEST Bus) रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिल्याने काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. Malad Bus Accident

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संबंधित बेस्ट बस आपली नियमित फेरी पूर्ण करून डेपोकडे परत जात होती. त्यावेळी अचानक बसचे नियंत्रण बिघडल्याने तिने समोर असलेल्या काही वाहनांना धडक दिली. या अपघातात एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाल्याचे दिसून आले.



अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि कार्यालयीन वेळ असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.



घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नसून, अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून