Car Accident : धक्कादायक! १५ वर्षाच्या मुलाने भरधाव कारने ९ जणांना उडवलं, ५ गंभीर जखमी

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत तब्बल ९ जणांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पून्हा एकदा पोर्श कार अपघात प्रकरण डोळ्यासमोर उभे राहिले आहे.  (Car Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी गिरणा टाकी ते चर्च या मार्गावर हा अपघात झाला. अल्पवयीन मुलगा कार चालवत असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी आणि दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की काही जण रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले.



या घटनेत दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका इलेक्ट्रिक दुचाकीलाही कारची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. जखमींना मदत करण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. दरम्यान, संतप्त नागरिकांचा रोष पाहून कार चालवणारा अल्पवयीन मुलगा वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे रामानंदनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलगा कोण आहे, त्याच्याकडे कार कशी आली आणि वाहन चालवण्याची परवानगी कोणी दिली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि