पुणे :पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बगाडवाडी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका तरुणाने वडिलांचा आणि सख्ख्या भावाचा निर्घृण खून केला.विशेष म्हणजे,दुहेरी हत्याकांड केल्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाशेजारीच झोपल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी बाबाजी मुकणेला पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाट विरोधात भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने ...
लग्नाच्या हट्टामुळे खूण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी बाबाजीचे यापूर्वी लग्न झाले होते.मात्र,कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी गेल्या चार ते पाच वर्षापासून वेगळी तीच्या माहेरी राहत आहे. यामुळे बाबाजी सतत वडील आणि भावाकडे पुन्हा लग्न लावून देण्याचा आग्रह करत होता.पण विवाहीक असूनही दुसऱ्या लग्नाच्या हटीला बाबजीच्या बापाने नकार दिला होता.वडील आणि भाऊ त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा राग त्याच्या मनात वाढत गेला.अखेर हा राग इतका वाढला की त्याने थेट वडील आणि भावाची हत्या करण्याचा पाऊल उचलला.
जळगाव : जळगावच्या धरणगाव (Dharangaon ) तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण ...
आधी मारहाण,नंतर दगडाने ठेचून हत्या
घटनेच्या दिवशी बगाडवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपीने वडील जयराम महादू मुकणे (वय 65) आणि भाऊ राजू जयराम मुकणे (वय 30) यांच्यावर लाकडी चोपणीने हल्ला केला.दोघेही गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केली.या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे,हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला नाही.उलट रात्रभर मृत वडील आणि भावाच्या मृतदेहाशेजारीच पडून राहिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.या प्रकरणी युवराज जयराम मुकणे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.कौटुंबिक वाद आणि लग्नाच्या कारणावरून मुलानेच वडील आणि भावाचा खून केल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण जुन्नर तालुका हादरला आहे.नातेसंबंधांमधील वाढता तणाव आणि मानसिक अस्थिरतेचा हा आणखी एक गंभीर समोर आला आहे.





