Jalgaon : मतदार यादी कामात हलगर्जी महागात ! जळगावात शिक्षकांसह १३ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

जळगाव : मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरात (Jalgaon city) शिक्षकांसह १३ कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निवडणूक (Election) प्रक्रियेशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (Navinchandra Ashok Bhavsar) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात (Jalgaon City Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान मतदार यादीतील मॅपिंग (Mapping), अस्पष्ट छायाचित्र दुरुस्ती आणि अन्य प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.




वारंवार सूचना देऊनही कामात दिरंगाई


प्रशासनाच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२५ पासून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लेखी तसेच मौखिक सूचना देण्यात आल्या होत्या. विविध बैठका, आढावा सभा आणि पत्रव्यवहारातून कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे निर्धारित मुदतीत पूर्ण केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मतदार यादी पुनर्निरीक्षण हे निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे काम मानले जात असून, त्यात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम ३२ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षक, लिपिक आणि मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश असून, या कारवाईमुळे निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




गुन्हा कोणावर दाखल झाला ?


गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांमध्ये अर्जुन काशीनाथ ठाकरे (शिक्षक- प्रतिभा माध्यमिक विद्यालय), फारूक शाह हानिफ शाह (युनिक- प्राथमिक उर्दू शाळा, मेहरुण), शुभम रमेश गजभिये (लिपीक- मनपा जळगाव), विकास सुकलाल चव्हाण (पद्माबाई बारकू हायस्कूल, सुप्रिम कॉलनी जळगाव),हितेंद्र विलास जोशी (शिक्षक- ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव ), हुसेन सरदार तडवी (मनपा उर्दू शाळा, सुप्रिम कॉलनी जळगाव), मोहंमद परवेज शेख हुसेन (मनपा उर्दू शाळा, सुप्रिम कॉलनी जळगाव), भागवत तुळशीराम महाजन (शारदा माध्यमिक विद्यालय, सुप्रिम कॉलनी जळगाव), कोमल निळकंठ तायडे (लिपिक- शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव), संजय गोपाळ चौधरी (महाराणा प्रताप विद्यालय, प्रेमनगर, जळगाव), कल्पेश गोपाल पवार (लिपिक- मनपा, जळगाव), संजीव नामदार तडवी (शिक्षक- मुंदडा हायस्कूल, जळगाव), कल्पेश यशवंत पाटील (लिपिक- जिल्हा परिषद, जळगाव) यांचा समावेश आहे.


या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी करत आहेत.

Comments
Add Comment

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याने नाराजी मुंबई : बीड दौऱ्यादरम्यान

Jalgaon : रेल्वेतून पडला, सुदैवाने वाचला ; एकदा मृत्यूला हुलकावणी दिली मात्र ती चूक जिवावर बेतली... काळाने त्याला हिरावलेच

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काळ जवळ आलेल्या एका तरुणाने एकदा मृत्यूला हुलकावणी दिली

Kolhapur Explosion : कोल्हापुरात बंद घरात भीषण स्फोट; जिलेटिनच्या काड्यांचा वापर झाल्याचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सुर्वे नगर परिसरात एका बंद घरात झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली

Jalgaon Accident : टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या

MPSC Group C 2026: उमेदवारांची धाकधूक वाढली! तलाठीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; साईट डाऊन होण्याआधी करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तलाठी (ग्राम महसूल

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला धडक, ट्रकखाली कार चिरडली

पुणे :  पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे