पुणे : पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ आणि सांगली परिसरात धाडी टाकून तब्बल ३ हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर, आता या प्रकरणाचे धागेदोरे अधिक गडद झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी विश्रांतवाडी परिसरात छापा टाकून एका टेम्पोमध्ये लपवून ठेवलेला ३४० किलो अमली पदार्थांचा कच्चा माल जप्त केला आहे.या कच्च्या मालामध्ये घातक रासायनिक पदार्थांचा समावेश असून, त्याचा वापर मेफेड्रोन आणि 'मेथ' सारखे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात होता, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
मुंबई : फिफा वर्ल्ड कप २०२६ (FIFA World Cup 2026) ची सुरुवात 11 जूनपासून होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशात खेळवला जाणार आहे. प्रथमच 48 ...
अटक केलेल्या आरोपींच्या कसून चौकशीदरम्यान, मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारे रसायन विश्रांतवाडीतील एका टेम्पोमध्ये दडवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हा ३४० किलो साठा जप्त केला. हा सर्व कच्चा माल पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर यातील नेमक्या रसायनांची माहिती स्पष्ट होईल, असे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.प्राथमिक अंदाजानुसार, खोकल्याच्या औषधासाठी जे रासायनिक पदार्थ वापरले जातात, त्याचाच वापर करून हे अमली पदार्थ बनवले जात असल्याचा संशय आहे. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे देश-परदेशात पसरली आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात हे मेफेड्रोन तयार केले जात होते. या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा परदेशात पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याचा शोध सुरू आहे.
नवी दिल्ली : भारतात चांदीच्या वाढत्या आयातीवर आणि त्यामुळे परकीय चलन साठ्यावर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ...
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मेफेड्रोन विक्री प्रकरणात शुक्रवारी एका हॉटेल कामगाराला अटक केली असून, त्याच्याकडून २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात पिंपरीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेळके याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या अटकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "पुणे पोलिसांनी केलेला तपास आणि कारवाई कौतुकास्पद आहे. पोलिसांचा तपास अगदी योग्य दिशेने सुरू असून दोषींची गय केली जाणार नाही."






