Nashik TCS Case : नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपपत्रात जलीलचं नाव

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ‘टीसीएस’ च्या नाशिक कार्यालयातील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे.



३,५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल


नाशिक पोलिसांनी TCS प्रकरणात दाखल एकूण ९ गुन्ह्यांपैकी पहिल्या गुन्ह्यात सुमारे ३,५०० पानांचे पहिले आरोपपत्र (charge sheet) न्यायालयात दाखल केले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Devlali Camp Police Station) दाखल झालेल्या या पहिल्या गुन्ह्यात बलात्कार, धार्मिक भावना दुखावणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपपत्रातील माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानचा (Nida Khan) अटकपूर्व जामीन नाशिक न्यायालयाने (Nashik Court) फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. यावेळेस एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) यांनी निदा खानला पोलिसांपासून लपवण्यासाठी आश्रय दिल्याचे समोर आले होते.



“इम्तियाज जलील यांना विचारावं लागेल”


निदा शोधासाठी निघालेल्या गुन्हे शाखेने (Crime Branch) मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे चौकशीसाठी बोलावले आणि निदा खान कुठे आहे, असे विचारले; त्यावेळेस पटेल यांनी वारंवार एकच उत्तर दिले. ते म्हणजे “इम्तियाज जलील यांना विचारावं लागेल”. कसून चौकशी केल्यानंतर अखेर मतीन पटेल (Mateen Patel) यांनी पोलिसांना छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव-कौसर सिडको भागातील त्या जागेचा पत्ता दिला, जिथे निदा आणि तिचे कुटुंबीय लपले होते. याठिकाणी पोलिसांनी तात्काळ छापा टाकून निदा खान, तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांना ताब्यात घेतले.



पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार


दरम्यान, इम्तियाज जलील यांनी निदा खानच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचं नाकारलेलं नाही. २१ एप्रिल रोजी त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, आपण पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. तसेच प्रशासनाने केलेल्या घरतोडीच्या कारवाईविरोधात त्यांनी आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. एका सभेत बोलताना जलील म्हणाले होते, “आम्ही हा लढा कायदेशीररित्या लढू. पक्ष मतीन यांना त्याच जागी यापेक्षा मोठे आणि चांगले घर बांधून देईल.”



इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर


या संपूर्ण प्रकरणावर सध्या सौदी अरेबियात हज यात्रेसाठी गेलेले इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे नाव आरोपपत्रात आल्याची मला कल्पना नाही. पण मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी आधीच मान्य केले आहे की मी त्या मुलीच्या (निदाच्या) कुटुंबाला भेटलो होतो आणि जे मला योग्य वाटते, त्यासाठी माझा लढा सुरूच राहील.” दुसरीकडे, मतीन पटेल यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले की, “जलील हे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने पटेल यांनी त्यांचे नाव घेतले असावे. यात कोणताही कट नाही, याला केवळ राजकीय रंग दिला जात आहे.”

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी