Nashik : पहिल्याच पावसात मोठी दुर्घटना ! कपालेश्वर मंदिरासमोरील वाड्याची भिंत कोसळून एक भाविक गंभीर जखमी

नाशिक : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात कपालेश्वर मंदिर परिसरातील 'बिवलकर वाडा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या वाड्याची भिंत कोसळली, तसेच छताचे पत्रेही उडून गेले. या दुर्घटनेमुळे परिसरात उपस्थित असलेल्या अनेक भाविकांना दुखापत झाली असून, एका भाविकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कारभाराविरुद्ध भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Nashik News )


सदरील वाड्याची मिळकत ही 'संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर' (Kapaleshwar Temple) या संस्थेने खरेदी केलेली आहे. या मिळकतीमधील अर्धा भाग अत्यंत धोकादायक झाला असल्याने तो उतरवून घेण्याबाबत महापालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली आहे, तर उर्वरित अर्ध्या भागात अनधिकृत बांधकाम असून त्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई प्रलंबित आहे.



या संपूर्ण जागेबाबत आणि तिथल्या धोकादायक बांधकामाविषयी संस्थानने वेळोवेळी महानगरपालिकेशी लेखी पत्रव्यवहार केला होता. मात्र, महापालिकेने यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या याच ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे अखेर हा अनर्थ घडला.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील अशा धोकादायक बांधकामांमुळे भाविकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून, भविष्यात घडणाऱ्या संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी