मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. तब्बल 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने अशा 12 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
12 सामन्यांची ऐतिहासिक मालिका
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध न्युझीलंड मालिकेत तब्बल १२ सामने खेळले जाणार आहेत. सात वर्षांत पिहल्यांदा भारत एका दौऱ्यात येवढे सामने खेळणार आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.या दौऱ्याची सुरुवात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपासुन होणार आहे. भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. ख्राईस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर पहिला टी-20 सामना रंगणार असून, त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. न्युझीलंडमध्ये भारत आणि न्युझीलंडमधील पहिल्यांदा पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणारा आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळा द्वारा (बीसीसीआय) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांची ...
टी-२० मालिकानंतर वनडे मालिका
टी-20 मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. आगामी आयसीसी स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. वनडे मालिकेची सुरुवात चार नोव्हेंबरपासून होणार आहे. तर अखेरचा सामना नोव्हेंबर १५ ला खेळला जाणार आहे.
कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष्य
दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 19 नोव्हेंबरपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाईल. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 27 नोव्हेंबरपासून ख्राईस्टचर्च येथे रंगणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) दृष्टीने ही मालिका निर्णायक ठरू शकते. भारतीय संघ सध्या 52 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
🚨 INDIA TOUR OF NEW ZEALAND 2026 🚨 1st T20I - Oct 22 2nd T20I - Oct 24 3rd T20I - Oct 27 4th T20I - Oct 30 5th T20I - Nov 1 1st ODI - Nov 4 2nd ODI - Nov 7 3rd ODI - Nov 10 4th ODI - Nov 13 5th ODI - Nov 15 1st Test - Nov 19 to 23 2nd Test - Nov 27 to Dec 1 pic.twitter.com/N7H7JiFfXO
— Johns. (@CricCrazyJohns) June 3, 2026
भारत विरुद्ध न्यूझीलंड संपूर्ण वेळापत्रक
टी-20 मालिका
22 ऑक्टोबर – पहिला टी-20, ख्राईस्टचर्च
24 ऑक्टोबर – दुसरा टी-20, ख्राईस्टचर्च
26 ऑक्टोबर – तिसरा टी-20, ऑकलंड
29 ऑक्टोबर – चौथी टी-20, हॅमिल्टन
31 ऑक्टोबर – पाचवा टी-20, टौरंगा
वनडे मालिका
2 नोव्हेंबर – पहिला वनडे सामना
5 नोव्हेंबर – दुसरा वनडे सामना
8 नोव्हेंबर – तिसरा वनडे सामना
11 नोव्हेंबर – चौथा वनडे सामना
14 नोव्हेंबर – पाचवा वनडे सामना
कसोटी मालिका
19 ते 23 नोव्हेंबर – पहिली कसोटी, वेलिंग्टन
27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – दुसरी कसोटी, ख्राईस्टचर्च
तिकिटांसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता





