Crime : 'याठिकाणी' कैद्यांना चक्क दारुचा पुरवठा; जेवण पुरविणाराच होता सामील

राहुरी : राहुरीतील बंदीखान्यात कैद्यांना जेवण देणाराच कैद्यांना चक्क दारुचा पुरवठा करत असल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून बिनधास्तपणे जेलमध्ये हा सर्व प्रकार चालत होता. जेलप्रशासन मात्र या प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे चित्र होते. अखेर कर्तव्यावर असलेल्या हवालदार सानप यांना संशय आल्याने, अखेर हे रॅकेट उघड होत, पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.



नेमके प्रकरण काय ?


राहुरी येथे न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असलेल्या कैद्यांना भत्ता पुरवणाऱ्या अधिकृत पुरवठादारांचा प्रतिनिधी किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ (वय ४०) याने कैद्यांना ३० मे २०२६ रोजी भत्ता आणला होता, यावेळेस गार्ड ड्युटीवर हजर असणारे पोलीस हवालदार रामनाथ सानप यांनी सदर भत्त्याची पाहणी केली. पाहणीत त्यांना त्यामध्ये कैद्यांसाठी बंदी असलेले पदार्थ मिळून आले. तसेच किशोर वाहूरवाघ (Kishore Wahoorwagh) याला यासंबंधात विचारले असता तो अडखळत बोलत असल्याचे निदर्शनास आले.



याबाबत पोलीस हवालदार रामनाथ सानप (Police Constable Ramnath Sanap) यांनी सब जेलर खामकर यांना लेखी रिपोर्ट देऊन बोलावून घेत, सदर भत्त्याची पाहणी करण्याबाबत कळवले. त्यावरून सबजेलर खामकर यांनी सदर अखाद्य व अपेय पदार्थाची पाहणी केली असता, त्यांना त्यात कैद्यांना देण्यास बंदी असलेले पदार्थ दिसून आले. त्याबाबत त्यांनी सदर अखाद्यपदार्थाचा पंचनामा तसेच दि. २९ मे २०२६ रोजीही सायंकाळचे जेवणावेळी त्यांनी कैद्यांना अपेय असे पाणी (वास येत असलेले) आणले होते. त्याबाबत पोलीस हवालदार नागरगोजे यांनी सबजेलर खामकर यांना कळवले होते. त्यावरून त्यांनी पाहणी केली असता, त्यांना त्यात दारू असल्याचे निदर्शनास आले होते.


त्यावरून सबजेलर रामचंद्र पांडुरंग खामकर महसूल सहाय्यक तहसील कार्यालय राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ यांचे विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६३२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २२३ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गीते करीत आहेत.


तसेच सदर आहार भत्ता पुरवठादारावर कायदेशीर कारवाई करण्याकरता राहुरी पोलिसांनी जेलअधीक्षक यांचेकडे अहवाल पाठविला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात

Nashik : कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गिरीश महाजन

Nashik : कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला खरंच राहिला आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या