Minister Adv. Ashish Shelar : गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा

 मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्त्वीय महत्त्व आणि संभाव्य संपादन याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी, गुहागरचे तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, गोपाळगड या किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप लक्षात घेता त्याची खासगी मालकी आणि याचा मूळ इतिहास शोधण्याची गरज आहे. किल्ला मराठा कालखंडातील असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता उपलब्ध अभिलेख, लिलाव प्रक्रिया, इव्हॅक्युई प्रॉपर्टीचा दर्जा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी, असेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.



मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात उभारण्यात आलेला हा किल्ला पुढे आंग्रे यांच्या आरमारी व्यवस्थेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पश्चिम किनारपट्टीवरील जलनीतीत या किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विशेष बांधकाम शैली आणि स्थापत्य वैशिष्ट्यांमुळेही हा किल्ला पुरातत्त्वीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.सद्यस्थितीत किल्ला परिसरातील काही अनधिकृत बांधकामे प्रशासनाने हटविल्याने संबंधित प्रकरण न्यायालयात गेले असल्याने यासंदर्भात घाईघाईने कोणताही निर्णय न घेता सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. इव्हॅक्युई प्रॉपर्टी घोषित करण्यामागील कागदपत्रे, त्यावेळची प्रक्रिया आणि उपलब्ध पुरावे यांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

Comments
Add Comment

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात