Mumbai News : गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला? मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

मुंबई : मुंबईला (Mumbai) लक्ष्य करत रचण्यात आलेला मोठा दहशतवादी कट दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने उधळून लावल्याचा दावा समोर आला आहे. वांद्रे परिसरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा बदला घेण्यासाठी मुंबईत घातपात घडवून आणण्याचे नियोजन सुरू असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात दिल्ली स्पेशल सेलने (Delhi Special Cell) मोठी कारवाई करत आठ संशयितांना अटक केली असून, त्यापैकी तीन जण मुंबई आणि परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.


मुंबईतील वांद्रे परिसरातील गरीबनगर येथे रेल्वेच्या (Railway) जागेवरील अवैध बांधकामे आणि प्रार्थनास्थळ हटवण्यात आल्यानंतर काही कट्टरपंथी घटक सक्रिय झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. याच कारवाईचा बदला घेण्याच्या उद्देशाने मुंबईत मोठा हल्ला घडवून आणण्याचे नियोजन सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संशयितांच्या मोबाईल (Mobile) फोनमधून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांमधून (Digital Evidence), चॅट्समधून (Chats) आणि सोशल मीडिया इनपुटमधून (Social Media Input) गरीबनगर परिसराची सविस्तर माहिती गोळा करण्यात आल्याचे उघड झाले आहे.



दादर रेल्वे स्थानकासह (Dadar Railway Station) गर्दीच्या भागांची रेकी


अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या मोबाईल फोनमधून गरीबनगर परिसराचे अनेक फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये परिसरासह तेथील पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था आणि तैनात सुरक्षा दलांची माहितीही संकलित करण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय, मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेरील भाजी मार्केट ब्रिज परिसराचीही रेकी करण्यात आल्याचा संशय आहे. ही केवळ प्राथमिक पाहणी होती की संभाव्य हल्ल्याच्या तयारीचा भाग होता, याचा तपास सध्या सुरू आहे.


पाकिस्तानी हँडलर्स (Pakistani Handlers) आणि अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंधांची चौकशी


या कथित कटाचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. पाकिस्तानस्थित हँडलर्स आणि मुंबईतील काही संशयितांमध्ये सातत्याने संपर्क सुरू असल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, यावर खान तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित काही व्यक्तींशी संभाव्य संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. संशयितांच्या व्हॉईस नोट्स (Voice Notes), चॅट्स आणि इतर डिजिटल सामग्री फॉरेन्सिक (Forensic) तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.



मुंब्रा येथील तरुण अटकेत; कुटुंबियांचा निर्दोष असल्याचा दावा


या कारवाईदरम्यान ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात राहणाऱ्या तौकीर रिजवान अहमद शेख (२४) यालाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान तौकीर गेल्या दहा दिवसांपासून कुर्ला येथील हुजैफा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीचा अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. तसेच तौकीरच्या बँक खात्यात आठ हजार रुपये जमा झाल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. मात्र, "माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवले जात आहे," असा दावा तौकीरच्या आईने केला आहे.


मुंबई आणि मिरा रोडमध्ये तपास तीव्र


दिल्ली स्पेशल सेलची टीम रविवारी मुंबई आणि मिरा रोड परिसरात दाखल झाली असून पुढील तपासासाठी तळ ठोकून आहे. या कथित कटात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि तांत्रिक माहितीची सखोल पडताळणी करण्यात येत आहे. अद्याप तपास यंत्रणा कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या नसल्या तरी या कारवाईमुळे मुंबईवरील संभाव्य मोठे संकट टळल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही, अध्यक्ष सदा सरवणकरांनी दिली माहिती

सिद्धिविनायक मंदिरातून दर्शनासाठी पैसे घेणारे ९ कर्मचारी बडतर्फ मुंबई : श्री सिद्धिविनायक

BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर,

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट

Navanath Ban : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नवनाथ बन यांची टीका; भाजपच्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार