IPL 2026 Final : विराटची दमदार खेळी, RCB सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन; गुजरातचा 5 विकेट्सने पराभव

Ahemdabad : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने 156 धावांचे लक्ष्य 18 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले आणि आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली.


विराटचा विराट शो


मोठ्या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने आपला अनुभव दाखवून दिला. त्याने अवघ्या 42 चेंडूत 75 धावांची तुफानी खेळी करत बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला. त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तोच आयपीएल 2026 च्या फायनलचा सामनावीर झाला.



वेगवान सुरुवातीने गुजरातवर दबाव


विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी RCB ला आक्रमक सुरुवात करून दिली. अय्यरने 16 चेंडूत 32 धावांची खेळी करत गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. राशिद खानने एका षटकात दोन विकेट्स घेत सामना रंगतदार केला, मात्र विराटने डाव सांभाळत विजय जवळ आणत १८ व्या षटकांत विजय मिळवला.


RCB गोलंदाजांची भेदक कामगिरी


याआधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या RCB ने गुजरातला 20 षटकांत आठ बाद 155 वर रोखले. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 50 धावा केल्या, तर इतर फलंदाज अपयशी ठरले. बंगळुरूकडून रसिख सलामने 3 विकेट्स घेत सर्वाधिक प्रभाव टाकला. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 बळी घेत गुजरातला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.






सलग दुसरे विजेतेपद

गेल्या हंगामात पहिले आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या RCB ने यंदाही जेतेपद कायम राखत इतिहास रचला. सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मोजक्या संघांमध्ये बंगळुरूने स्थान मिळवले आहे. आयपीएल 2025 नंतर आता आयपीएल 2026 मध्ये ट्रॉफी जिंकली आहे



आयपीएल पर्पल कॅप : कागिसो रबाडा
आयपीएल ऑरेंज कॅप : वैभव सूर्यवंशी

आयपीएलचे विजेते

चेन्नई सुपर किंग्स - २०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३
मुंबई इंडियन्स - २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०
कोलकाता नाइट रायडर्स - २०१२, २०१४, २०२४
रॉयल चॅलेंजर्स बंगळरू - २०२५, २०२६
राजस्थान रॉयल्स - २००८
सनरायझर्स हैदराबाद - २०१६
डेक्कन चार्जर्स - २००९
गुजरात टायटन्स - २०२२





Comments
Add Comment

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत