मोठी बातमी ! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला

​Crude oil prices hit record highs : जागतिक स्तरावर महागाईने डोके वर काढले आहे. अमेरिका आणि इराण (America and Iran) यांच्या धोरणामुळे जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली घडत आहे. आता पुन्हा एकदा जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिका-इराण तणावाचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होत आहे , त्यामुळे बाजारात देखील तेजी आली आहे.


कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला असून कच्च्या तेलाची (crude oil) प्रति बॅरल किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भयंकर हल्ल्यामुळे या किंमती वधारल्या आहेत. या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याचे कारण


आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सुरुवातीपासून वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराबाबत वाढती अनिश्चितता. तेहरान अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि अण्वस्त्रांशी संबंधित संरक्षणाची मागणी करीत आहेत. अमेरिका या दोन्ही मागण्या सातत्याने फेटाळून लावत आहे. वॉशिंग्टनने यापूर्वीच सांगितले आहे की, प्रमुख जलमार्गांवरील जहाजांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणे योग्य नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, जो करार वाईट करार म्हणून वर्णन केला जाईल तो आपण स्वीकारणार नाही.


दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्या आणि भारत सरकार आधीच आर्थिक ओझ्याखाली दबले जात आहेत, भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि अशा परिस्थितीत तणाव वाढल्याने व कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा उसळल्याने भारतावर आर्थिक दबाव आणखी वाढू शकतो.

Comments
Add Comment

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर