Crime News : मोदी, फडणवीस, शिंदे सर्वांकडून तरुणावर शुभेच्छांचा वर्षाव, 'ही' एक चूक तरुणाला पडली महागात, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Crime News : सोशल मीडिया आणि मित्रपरिवारामध्ये हवेत गोळीबार करणारे अनेक तरुण आपण पाहतो. माझे मोठं मोठ्या नेत्यांसोबत कॉन्टॅक्ट आहेत , हे दाखवण्यासाठी काही तरुण मंडळी भलतीच उत्सुक असतात. मग त्यासाठी काहीही करतात. नेते मंडळींच्या मागे मागे फिरत असतात नाहीतर खोटे फोटो बनवतात. पण असाच शहाणपणा करण्याचा प्रयत्न एक तरुणाला चांगलाच महागात पडला आहे.


स्वतःच्या वाढदिवसाचा रुबाब दाखवण्यासाठी सोशल मीडियावर एका तरुणाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत लेटरहेड आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून चक्क चॅट जीपीटी या कृत्रिम बुद्धिमत्ता ॲपच्या माध्यमातून बनावट शुभेच्छापत्र तयार केले. अर्थात सत्य समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.



हुबेहूब स्वाक्षऱ्या असलेले बनावट शुभेच्छापत्र


मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी विश्वजीत विजय धुळगंड (वय २४, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर)याचा २४ वा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने चॅट जीपिटी या ॲपच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाचे अधिकृत लेटरहेड, राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि त्यांच्या हुबेहूब स्वाक्षऱ्या असलेले बनावट शुभेच्छापत्र तयार केले.



जीपीटीच्या मदतीने बनावट शुभेच्छा


आता एवढ्या मोठ्या नेत्यांचे शुभेच्छापत्र बनल्याने ते व्हायरलही झाले. नंतर हा प्रकार नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर, त्यांनी लगेचच घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित केले. सपोनि थोरात यांनी गोपनीय अंमलदार प्रमोद अशोक गाडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल बोडखे यांना तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत मांडवे बुद्रुक येथून विश्वजीत धुळगंड याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चॅट जीपीटीच्या साहाय्याने हे बनावट पत्र तयार करून इन्स्टाग्रामवर नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पोस्ट केल्याची कबुली दिली.


दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वजीत धुळगंड याच्याविरुद्ध पुढील कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने करावा. कोणत्याही राष्ट्रीय चिन्हांचा, व्हीआयपी लेटरहेडचा किंवा मान्यवरांच्या नावाचा/स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. अशा स्टंटबाजीपासून तरुणांनी दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती