LPG Gas Cylinder Price : LPG ग्राहकांना पुन्हा झटका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; आजपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price) पुन्हा एकदा वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही दरवाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि पाच किलोच्या लहान सिलेंडरपुरतीच मर्यादित आहे. घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांपासून ५३.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.



यापूर्वी गेल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price) सुमारे एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीमध्ये ही वाढ ९९३ रुपये होती, तर कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ९९८.५० रुपयांनी वाढली होती. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत ९९३ रुपयांची वाढ झाली होती. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर ९९०.५० रुपयांनी महागला होता.आजच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ३,११३.५० रुपये झाली असून कोलकातामध्ये ती वाढून ३,२५५.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर आज सकाळपासून ३,०६7.५० रुपयांना उपलब्ध आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत वाढून ३,२८3.५० रुपये झाली आहे.



व्यावसायिक गॅस सिलेंडरप्रमाणेच ‘लहान सिलेंडर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (एफटीएल) सिलेंडरच्या किमतीतही आजपासून ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर पाच किलोच्या एफटीएल सिलेंडरची किंमत ८२१.५० रुपयांपासून ८३२.५० रुपयांपर्यंत झाली आहे.घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत अखेरचा बदल यावर्षी ७ मार्च २०२६ रोजी करण्यात आला होता. त्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. (LPG Gas Cylinder Price)


देशातील प्रमुख ऑइल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुदानविरहित १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Gas Cylinder Price) सध्या दिल्लीमध्ये ९१३ रुपये आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९१२.५० रुपये आहे. तर कोलकातामध्ये ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलेंडर ९३९ रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या ९२८.५० रुपये आहे. (LPG Gas Cylinder Price)



Comments
Add Comment

राष्ट्रकुल खेळ २०२६: बॉक्सिंगमध्ये भारताचा सुवर्णधमाका; प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया ठरल्या सुवर्णकन्या!

ग्लासगो : राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. रिंगण गाजवत

Alluri Sitarama Raju Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात 'अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळा'चे उद्घाटन

₹१७,९०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण! विझियानगरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी आंध्र

Rashmika Mandanna Injured : शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला!

मुंबई : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्या चाहत्यांसाठी

Girl Apologizes To PM Modi : "मी फक्त १५ वर्षांची आहे, मला माफ करा": पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुलीचा माफीनामा; व्हिडिओ व्हायरल!

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या एका आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात चुकीची भाषा

Jammu Kashmir Terror Attack : धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांवर गोळीबार (Terror Attack) केल्याची

LPG Cylinder Price : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा! कमर्शिअल गॅस सिलिंडर 192 रुपयांनी स्वस्त

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. 1 ऑगस्ट