DCM Eknath Shinde : महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित, ठाण्यातून रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील

ठाणे : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.


यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव,आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरही भाष्य केले. ठाणे-पालघरपुरतेच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.


महायुतीमधील काही ठिकाणच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ तारखेपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील, ते माघार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढे चाललो आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी