नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ (JEE Advanced 2026) परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यंदा आयआयटी दिल्ली झोनच्या विद्यार्थ्यांनी कॉमन रँक लिस्टमध्ये वर्चस्व गाजवत पहिल्या तीन क्रमांकांवर कब्जा केला आहे. शुभम कुमार याने ऑल इंडिया रँक (AIR) 1 मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर विद्यार्थिनींमध्ये आरोही देशपांडे हिने सर्वोच्च स्थान मिळवत महिला गटात अव्वल कामगिरी केली आहे.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, शुभम कुमार याने ३६० पैकी ३३० गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर कबीर छिल्लर असून त्याने ३२९ गुणांची कमाई केली आहे. तर जतिन चाहर याने ३१९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. महिला उमेदवारांमध्ये अव्वल ठरलेल्या आरोही देशपांडे हिने २८० गुण मिळवले आहेत. JEE Advanced 2026 चा निकाल १ जून रोजी पहाटे सुमारे २ वाजता जाहीर करण्यात आला.
जॉर्जिया : आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर लग्नानंतर अवघ्या काही मिनिटांत दुःखाचा डोंगर कोसळला. अमेरिकेतील ...
यंदा JEE Advanced 2026 परीक्षेसाठी एकूण १ लाख ८७ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७९ हजार ६९४ उमेदवारांनी १७ मे रोजी झालेल्या परीक्षेला हजेरी लावली होती. जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार, एकूण ५६ हजार ८८० उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये १० हजार १०७ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
JEE Advanced 2026 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाची आवश्यकता असेल.






