Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, दोघांचा मृत्यू

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सोमवारी पहाटे अपघात झाला. ट्रक, कंटेनर आणि एर्टिगा यांच्या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


मुंबईच्या दिशेने तांदूळ घेऊन एक ट्रक जात होता. या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक वेगाने खाद्य तेल घेऊन जात असलेल्या कंटेनरला मागून धडकला. ही धडक झाली त्याचवेळी त्या भागातून एक एर्टिगा कार जात होती. ही एर्टिगा पण अपघातात सापडली. बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली.



अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला. एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे.



अपघातामुळे तांदुळाची पोती आणि खाद्यतेल रस्त्यावर सांडले. यामुळे काही वेळासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील चार मार्गिकांच्या वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला. वाहतुकीचा वेग मंदावला. वाहतूक पोलिसांनी आवश्यक ते उपाय करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले.




अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मदतकार्यात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणा सहभागी झाल्या.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून