Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे हिंदुत्व हे कुठल्याही अहिंदूंचे नुकसान करणारे नाही. त्यांचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकर आणि त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत, असे स्पष्ट मत अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक असलेल्या स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान सहयोग मंदिरात आयोजित करण्यात आले होते.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Devendra Fadnavis : पावसाच्या सरींना मान्सून समजू नका; पेरणीची घाई करू नका : मुख्यमंत्री फडणवीसांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : राज्यातील विविध भागांत १ जूनपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी हा पाऊस मान्सूनचा नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ...


यावेळी बोलताना ते म्हणाले, “सावरकर एक तत्त्व आहेत. ताठ मानेने, स्वाभिमानाने देशासाठी आणि धर्मासाठी कसे जगावे हे त्यांनी शिकवले. आज त्यांचा पक्ष किंवा अनुयायी शिल्लक नसले तरी काँग्रेसला दर दोन दिवसांनी स्वप्नात सावरकर येतात, ही त्यांची भीती आहे. समाजसुधारक, महाकवी, क्रांतिकारक आणि माणुसकीचे तत्त्व शिकवणारे म्हणून सावरकरांना एकट्याने अनेक भारतरत्न द्यावे लागतील, म्हणून सरकार त्यांना भारतरत्न देत नाही.”


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Devendra Fadnavis : पावसाच्या सरींना मान्सून समजू नका; पेरणीची घाई करू नका : मुख्यमंत्री फडणवीसांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : राज्यातील विविध भागांत १ जूनपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी हा पाऊस मान्सूनचा नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ...


शरद पोंक्षे पुढे म्हणाले, “सावरकरांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. कुठल्याही अहिंदूंचे नुकसान करणारे सावरकरांचे हिंदुत्व नाही. शंभर टक्के नास्तिक होण्याची परवानगी या हिंदू सनातनी धर्मात आहे, हे याचे सौंदर्य आहे. म्हणूनच हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला हवे.”


सेक्युलरिझम, निधर्मवाद आणि सर्वधर्मसमभाव या तीन रोगांतून हिंदू समाज जेव्हा बाहेर पडेल, तेव्हाच हिंदूंचे खरे कल्याण होईल. हिंदू धर्म टिकवणे हे प्रत्येक हिंदूचे नैतिक कर्तव्य आहे. या देशात राहून हिंदुस्थानचा पाकिस्तान बनवण्याचा विचार करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी काय वस्तू कुठून विकत घ्यायची, हे हिंदूंनी ठरवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


Accidental News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू...

Shirdi-Nashik Highway : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी-नाशिक महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि एर्टिगा कार यांच्यात ...


'हर घर सावरकर' मोहीम अधिक व्यापक करणार


राजकीय कार्यात प्रचंड व्यस्त असतानाही सामाजिक भान विसरले नाहीत, अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हर घर सावरकर’ योजना राज्यभरात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे सावरकरांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवणार असल्याचे शरद पोंक्षे यांनी सांगितले.

Tags
Eknath Shindesharad ponksheHindutvaveer savarkarSavarkar JayantiSwatantryaveer SavarkarThane newsHar Ghar Savarkar

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती