Student Assault : शिक्षक की राक्षस? तिसरीतल्या विद्यार्थ्याच्या हाताचा चावा घेतला अन्....

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्याशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या प्राचार्यांनी इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावल्याचा आणि त्याचा गळा दाबून काही क्षण हवेत उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Student Assault)


मिळालेल्या माहितीनुसार, वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याची माहिती एका विद्यार्थ्याने वर्गशिक्षिकेला दिली. त्यानंतर वर्गशिक्षिकेने प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले.



आरोपानुसार, प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याऐवजी संतापाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याचा हात चावला. तसेच त्याचा गळा पकडून काही सेकंद हवेत उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी घाबरल्याचे सांगितले जात आहे. (Teacher)


घटनेनंतर विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीच्या आधारे प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


या घटनेनंतर संबंधित प्राचार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आणि पालकांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून सर्व संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Crime)




Comments
Add Comment

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला